शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

जुईनगर रेल्वे रुळालगत तरुणाची आत्महत्या

By admin | Updated: January 26, 2017 03:39 IST

रेल्वे रुळालगतच्या झाडाला गळफास लावून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना जुईनगर स्थानकालगत घडली आहे. मयत तरुणाच्या

नवी मुंबई : रेल्वे रुळालगतच्या झाडाला गळफास लावून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना जुईनगर स्थानकालगत घडली आहे. मयत तरुणाच्या खिशातील उपचाराच्या चिठ्ठीवरून त्याची ओळख पटली तरी त्याच्या कुटुंबाविषयीची अधिक माहिती कळू शकलेली नाही, तर त्याने प्रकृतीच्या कारणावरून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.हेमंत चव्हाण (३७) असे मयत तरुणाचे नाव आहे. बुधवारी सकाळी जुईनगर रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर दोन रेल्वेमार्गामधील झाडाला लटकलेला त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाच्या अंगझडतीमध्ये पँटच्या खिशामध्ये उपचाराच्या चिठ्ठ्या तसेच डी. वाय. पाटील रुग्णालयाचे रुग्ण ओळखपत्र कार्ड आढळून आले. यावरून त्याच्या नावाची ओळख पटली आहे. शिवाय त्याच्यावर उपचार सुरू होते हे देखील पोलिसांना कळले आहे. त्यानुसार आजारपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असावी अशी शक्यता नेरुळ पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र त्याच्या कुटुंबाविषयीची अधिक माहिती पोलिसांना कळू शकलेली नाही. (प्रतिनिधी)