शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

Video: पोलीस मुख्यालयाच्या इमारतीवरून आत्महत्येचा प्रयत्न; कळंबोली येथील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 14:13 IST

पोलिसाने जीवावर उदार होऊन वाचवले प्राण  

सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई - कळंबोली येथील पोलीस मुख्यालयाच्या इमारतीवरून एक व्यक्ती आत्महत्येच्या प्रयत्नात होती. तीन मजली इमारतीवरील पाण्याच्या टाकीवर चढून ही व्यक्ती बसली होती. मात्र एका पोलिसाने शिताफीने त्याच्यावर झडप टाकून स्वतःसह त्याला टेरेसवर झोकून दिले. यामध्ये नैराश्यात आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीचे प्राण वाचले असून त्याला वाचवणारा पोलीस जखमी झाला आहे.

शनिवारी सकाळी 10 वाजण्यास हा प्रकार घडला. पोलीस मुख्यालयाच्या तीन मजली इमारीवर एक व्यक्ती चढली होती. तो टेरेसवरील पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येच्या प्रयत्नात होता. याची माहिती मिळताच कळंबोली पोलीस तसेच मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी तिथे धाव घेतली. समजूत काढून देखील तो खाली उतरत नसल्याने त्याने खाली उडी टाकल्यास अलगत पकडण्याची तयारी पोलिसांनी केली होती. मात्र त्यातही अधिक धोका होता.

त्यामुळे टेरेसवर गेलेल्या पोलिसांनी एका बाजूने त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. त्याच वेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने पाठीमागून पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीवर झेप टाकून स्वतसोबत त्याला टेरेसवर झोकून दिले. त्यानंतर सदर व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याला दुखापत झाली असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणारी व्यक्ती मूळची बीडची असून त्याच्या नैराश्याचे कारण कळू शकलेले नाही. योगेश चांदणे (30) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तर क्यूआरटीचे पोलीस शिपाई स्वप्नील मंडलिक यांनी त्यांचे प्राण वाचवले.

टॅग्स :Policeपोलिस