शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
4
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
5
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
6
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
7
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
8
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
9
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
10
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
11
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
12
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
13
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
15
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
16
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
17
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
18
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
19
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
20
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे

नवी मुंबईकरांच्या आरोग्य सुविधांसाठी भरीव तरतूद!, नवी मुंबई महानगरपालिकेचा ४८२५ कोटींचा अर्थसंकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 05:16 IST

Navi Mumbai Municipal Corporation budget of 4825 crores : महानगरपालिकेची निवडणूक जवळ आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसह शहरवासीयांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले होते.

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचा २०२१-२२ साठी ४८२५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त अभिजित बांगर यांनी सादर केला. यात शहरवासीयांसाठी कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. पायाभूत सुविधांसह आरोग्यसेवेसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद आहे. स्वच्छता सर्वेक्षणासह शहर सुशोभीकरणावरही भर देण्यात आला आहे.महानगरपालिकेची निवडणूक जवळ आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसह शहरवासीयांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले होते. आयुक्त तथा प्रशासक अभिजित बांगर यांनी अर्थसंकल्प सादर करताना यामध्ये नागरिक केंद्रित योजनांचा समावेश असल्याचे स्पष्ट केले. करवाढ न करता उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. पुढील वर्षभरात स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून सर्वाधिक १४०१ कोटी ४६ लाख रुपये व मालमत्ता कराच्या माध्यमातून ६०० कोटी रुपये उत्पन्न गृहीत धरण्यात आले आहे. गतवर्षी कोरोनामुळे विकासकामे होऊ शकली नाहीत. यामुळे महापालिकेच्या तिजोरीत १६२७ कोटी ४२ लाख रुपये संकीर्ण जमा आहे. यामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प तब्बल ४८२५ कोटी नऊ हजार रुपयांचा झाला आहे. महानगरपालिकने नागरी सुविधांसाठीच्या योजनांसाठी १५६१ कोटी ६९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पामबीच रोडसह शहरात महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी उड्डाणपुलांचे नियोजन करण्यात आले आहे. रस्ते, पदपथ, गटारे यांसाठी तब्बल ५८८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.कोरोनामुळे आरोग्य सुविधांचे महत्त्व सर्वांच्याच लक्षात आल्याने गतवर्षीपेक्षा आरोग्य विभागासाठी १८० कोटी रुपये अतिरिक्त देण्यात येणार आहेत. स्वत:चे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासह सर्व रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठीही आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. शहरात स्मार्ट पार्किंग योजना राबविण्यात येणार आहे. स्वच्छता अभियानामध्ये देशात पहिला क्रमांक मिळविण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने निश्चित केले असून, स्वच्छतेसह शहर सुशोभीकरणासाठीच्या कामांचाही अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई