शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात कामोठेचे सुबोध पाटील जखमी; मानेला गोळी चाटून गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 06:25 IST

श्रीनगर येथील मदत कक्षाला फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मदत सेंटरकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली. 

अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : दहशतवादी हल्ल्यात कामोठेचे सुबोध पाटील यांच्या मानेला गोळी चाटून गेल्याने जखमी झाले.  त्यांच्या पत्नी माणिक पाटील या सुखरुप  आहेत. मात्र, श्रीनगर येथील मदत कक्षाकडून पुरेशी माहिती मिळत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. सुबोध पाटील यांना श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. पाटील हे कस्टममधून सेवानिवृत्त झाले आहेत. हल्ल्याची बातमी कळताच अनेकांनी पाटील यांच्या घराकडे धाव घेतली होती. 

३९ पर्यटकांनी केले होते अमरनाथ यात्रेसाठी बुकिंग कामोठे सेक्टर २१ येथील राॅयल हाइट्स सोसायटीतील रहिवासी सुबोध पाटील आणि त्यांच्या पत्नी माणिक पाटील यांनी अमरनाथ यात्रेसाठी पनवेलमधून निसर्ग ट्रॅव्हल्सद्वारे  बुकिंग केले होते. त्यांच्या सोबत खारघर, पनवेल, तेलीपाडा मुळेखंड, उरण, येथील एकूण ३९ पर्यटकांनी बुकिंग केले होती. २१ ते ३० एप्रिलदरम्यान निसर्ग ट्रॅव्हल्सकडून अमरनाथ यात्रेसाठी नियोजन केले होते. 

श्रीनगर येथील मदत कक्षावर रहिवाशांची नाराजी काश्मीर पहलगाम येथील हल्ल्याची बातमी कळल्यानंतर सुबोध पाटील यांच्या सोसायटीतील रहिवाशांनी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या श्रीनगर येथील मदत कक्षाला फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मदत सेंटरकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली. मदत कक्षातून पाटील यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती चांगली आहे, एवढेच सांगितले जात आहे. 

पहलगाम येथील हल्ल्यासंदर्भात आईशी बोलणे झाले. मात्र, वडिलांशी काही बोलणे झाले नाही. वडील रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. त्यांची प्रकृती चांगली असून, आई सुखरुप आहे. - प्राची शामा, सुबोध पाटील यांची मुलगी  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला