शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

लाच मागितल्याप्रकरणी उपनिरीक्षकावर गुन्हा, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 04:03 IST

तक्रार दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीच्या भावाकडे लाचेची मागणी करणा-या पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई : तक्रार दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीच्या भावाकडे लाचेची मागणी करणा-या पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे यामध्ये इतर कोणत्या अधिकाºयांचा समावेश आहे का याचा अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे.तक्रारदार व्यक्तीच्या चुलत भावाविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला सहकार्य करण्यासाठी लाच मागण्यात आली होती. अटकेनंतर कमी दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, शिवाय गुन्ह्यातून सुटकेसाठी मदत करण्याचेही आमिष देण्यात आले होते. त्याकरिता सीबीडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक स्वप्निल वाघमारे यांनी अडीच लाख रुपयांची लाच मागितल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. यानुसार गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीच्या चुलत भावाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची शाहनिशा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वप्निल वाघमारेविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक अंजली आंधळे अधिक तपास करत आहेत. या प्रकरणामध्ये इतरही काही अधिकाºयांचा सहभाग असल्याची शक्यता आहे. तसेच या तक्रारीवरून गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तींना सुटकेसाठी न्यायालयीन प्रक्रियेत मदत करत असल्याचीही शक्यता वर्तवली जावू लागली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा