शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
4
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
5
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
6
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
7
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
8
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
9
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
10
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
11
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
12
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
13
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
14
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
15
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
16
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
17
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
18
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
19
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
20
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

अभ्यासिकांचा विद्यार्थ्यांना आधार; २८०० जणांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 02:16 IST

१४ ग्रंथालयांमध्ये ७० हजार पुस्तके केली उपलब्ध

- नामदेव मोरे नवी मुंबई : वाचन चळवळ वाढविण्यासाठी महापालिकेने विभागनिहाय ग्रंथालय सुरू करण्यास सुरवात केली आहे. १४ ग्रंथालयांमध्ये तब्बल ७० हजार ८४० ग्रंथ उपलब्ध करून दिले आहेत. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्यांसह जवळपास २८०० विद्यार्थी येथील अभ्यासिकेमध्ये नियमीत अभ्यास करत आहेत.देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. प्राथमीक ते उच्च शिक्षण देणाºया सर्व प्रमूख संस्थांनी त्यांचे केंद्र याठिकाणी सुरू केले आहे. चांगले शिक्षण देणाºया संस्था येथे असल्या तरी त्यामध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी २००४ पर्र्यंत अभ्यासिकांची सुविधा नव्हती. यामुळे महापालिकेने विभागनिहाय ग्रंथालय व अभ्यासीका सुरू करण्यास सुरवात केली.२००४ मध्ये सीबीडी बेलापूरमधील गौरव म्हात्रे कला केंद्रामध्ये मध्यवर्ती ग्रंथालय व अभ्यासीका सुरू केली. याच ठिकाणी स्पर्धा परिक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांसाठी संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून दिले. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. अभ्यासीकेचा लाभ घेवून अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेमध्ये यश मिळविले.नवी मुंबईमधील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परिक्षेसाठी परिश्रम घेण्याची जिद्द व चिकाटी होती. परंतु त्यांना संदर्भ ग्रंथ व अभ्यासीका नव्हती. ती कमतरता महापालिकेने पूर्ण केली. सद्यस्थितीमध्ये याठिकाणी तब्बल ५३८ विद्यार्थी नियमीत अभ्यास करण्यासाठी येत आहेत. हा प्रयोग यशस्वी ठरल्यामुळे विभागवार ग्रंथालय व अभ्यासिका सुरू केली.सद्यस्थितीमध्ये महापालिका कार्यक्षेत्रामध्ये एकूण १४ ग्रंथालय असून त्यापैकी दोन ठिकाणचा अपवार वगळता सर्व ठिकाणी अभ्यासीकांचीही सुविधा आहे. या ग्रंथालयांमध्ये ७० हजार ८४० ग्रंथ उपलब्ध असून स्पर्धा परिक्षेसाठी आवश्यक पुस्तकांचाही समावेश आहे. प्रत्येक ठिकाणी वृत्तपत्र व इतर नियतकालीकेही उपलब्ध करून दिली जात आहेत.सद्यस्थितीमध्ये गं्रथालयांचे १७५२ नियमीत सभासद असून जवळपास २८०० विद्यार्थी यामध्ये अभ्यास करत आहेत. अभ्यासिकेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागते. अभ्यासीकेमध्ये फोनचा वापर करण्यास मनाई असून कोणी गोंधळ करणार नाही याचीही काळजी घेतली जात आहे. यामुळे दिवसेंदिवस अभ्यासिकांना प्रतिसाद वाढू लागला आहे. लवकरच अजून दहा ग्रंथालय व १२ अभ्यासीका सुरू करण्यात येणार आहेत.१९ तास अभ्यासिका खुलीनवी मुंबई महानगरपालिकेने काही अभ्यासीका विद्यार्थ्यांसाठी तब्बल १९ तास खुल्या केल्या आहे. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री १ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अभ्यास करता येतो. अभ्यास करण्याच्या ठिकाणी देखभालीसाठी कर्मचाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे.