शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
3
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
4
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
5
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
6
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
7
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
8
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
9
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
10
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
11
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
12
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
13
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
14
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
15
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
16
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
17
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
18
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
19
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
20
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार

विद्यार्थ्यांचे वर्ग, शाळेतील व्यवस्थापन एकाच खोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:16 IST

जिल्हा परिषद शाळेतील चित्र : १७० शाळांमध्ये स्टाफ रूम नाही

अरुणकुमार मेहत्रेलोकमत  न्यूज नेटवर्क कळंबोली : पनवेल तालुक्यातील जि. प. शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना  गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षक धडपड करत आहेत.  शासनाकडून तसेच लोकसहभागातून शाळेची सुधारणा करण्यात येत आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील जि. प. शाळा डिजीटल तर झाल्या आहेत. पण १७० शाळेत मुख्याध्यापकासह शिक्षकांना स्टाफरूम नसल्याची बाब पुढे आली आहे. पनवेल तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात २४८ जि. प. शाळा आहेत. शासनाकडून जिल्हा परिषद शाळेच्या  भौतिक विकासावर भर देण्यात येत आहे. त्याप्रमाणे भौतिक सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. इंग्रजी माध्यमांच्या स्पर्धेत टिकण्यासाठीचा केलेला खटाटोप, जि. प. शाळांचा कायापालट करण्यात शासनाला यश आले आहे. विद्यार्थ्यांना   गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच डिजिटल शाळा करण्यात आल्या आहेत परंतु १७० शाळेत अद्याप मुख्याध्यापक कक्ष तसेच शिक्षकांसाठी स्टाफ रूम नाहीत. त्यामुळे   विद्यार्थ्यांचा वर्ग व शाळेतील व्यवस्थापन एकाच खोलीत चालत आहेत. त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे शिक्षक खासगीत सांगतात. कमी पटसंख्येच्या शाळेत मुख्याध्यापक नसतो तर १५० पेक्षा जास्त पट असलेल्या शाळेत मुख्याध्यापक पद असते. बहुतांश शाळा  एकल आणि द्विशिक्षकी  आहेत. बऱ्याच  शाळांत स्टाफरूम तसेच मुख्याध्यापक कक्ष नसल्याने शिक्षकांना अडचणी येत आहेत.

शिक्षकांना करावी लागतात कामे जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळेत शिपाई, क्लार्क, ही पदे नाहीत. शाळा उघडण्यापासून ते बंद करण्यापर्यंत सर्व कामे शिक्षकांना करावी लागतात. पटसंख्या लक्षात घेता कित्येक शाळा एकल आणि द्विशिक्षकी आहेत. अध्यापनाबरोबर शालेय कामेसुद्धा शिक्षकांना करावी लागत आहेत. 

या आहेत अडचणी nबहुतांश शाळेत मुख्याध्यापकपदाचा पदभार हा सहाय्यक शिक्षकाकडे असतो. त्यामुळे अध्यापनासेबतच शाळेची कामे करावी लागत आहे तर एका शिक्षकाला एक किंवा दोन वर्ग सांभाळावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. nशाळेत स्टाफ रूम नसल्याने शिक्षकांना शालेय विषयावर सविस्तर चर्चा करता येत नाही. बैठक घेण्यासाठी त्यांना शाळेच्या वेळांव्यतिरिक्त इतर वेळ ठरवावी लागते किंवा बाहेरील मैदानाचा उपयोग करावा लागत आहे. तसेच सतत वर्ग घेतल्याने थोडा वेळ विश्रांतीसाठी किंवा वाचन करण्यासाठी स्टाफ रूमची आवश्यकता असते. ती नसल्याने शिक्षकांना त्रास सहन करावा लागतो आहे. 

तालुक्यातील अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक कक्ष तसेच शिक्षकांसाठी स्टाफ रूम नसले तरी ज्ञान देण्याचे काम आमचे शिक्षक अविरतपणे करत असतात. विद्यार्थ्यांनाही पुरेशी व्यवस्था आहे. त्याचा कुठलाही त्रास होत नाही. शासनाच्या नियोजनानुसारच जिल्हा परिषद शाळांचे बांधकाम, वर्गखोल्यांचे काम केले जाते. - महेश खामकर, गटशिक्षणाधिकारी, पनवेल