शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

माणिकगडचे ऐतिहासिक वैभव जपण्याची धडपड; दुर्गभेटीसह जंगलसफारीसाठी पर्यटकांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 00:24 IST

शिवप्रेमी करताहेत श्रमदानातून संवर्धनाचे काम, माणिकगड हे आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले पर्यटनस्थळ व ऐतिहासिक ठिकाण आहे. शिवप्रेमींच्या प्रयत्नांमुळे राज्यातील दुर्गप्रेमींपर्यंत गडाची माहिती पोहोचू लागली आहे.

नामदेव मोरेनवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील दुर्लक्षित असलेल्या किल्ल्यांमध्ये माणिकगडचा समावेश असतो. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या गडाचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी शिवप्रेमींनी प्रयत्न सुरू केले आहेत. श्रमदानातून संवर्धनाचे काम सुरू करण्यात आले आहे. गडास भेट देणारे पर्यटक व दुर्गप्रेमींची संख्या वाढत असून, जंगलसफारीसाठीही या किल्ल्यास पसंती दिली जात आहे.

राज्यातील प्रमुख औद्योगिक वसाहत असलेल्या रसायनी-पातळगंगा परिसरात माणिकगडचा समावेश होतो. घाटावरून व कोकणातून होणाऱ्या व्यवसाय व रहदारीवर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेल्या किल्ल्यांमध्ये याचाही समावेश होतो. गडाच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलामुळे व खळाळत्या झरे, धबधब्यांमुळे पावसाळ्यात हजारो पर्यटक या परिसरात येतात. वडगाव, वाशीवली व ठाकूरवाडीतून जवळपास तीन तासांची पायपीट करून गडावर जातात. गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष, टाकी, दरवाजा हा ठेवा नष्ट होण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिक नागरिक व स्वराज्याचे वैभव या समूहातील सदस्यांनी तीन वर्षांपासून गडसंवर्धनाचे काम सुरू केले आहे. पाण्याच्या टाक्यांमधील गाळ काढला आहे. चुन्याच्या घाण्याच्या परिसराची साफसफाई केली आहे. दरवाजाजवळ सफाई केली आहे. गडावर माहिती फलक लावण्यात आला आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिर परिसराचीही स्वच्छता करण्यात आली आहे.

माणिकगड हे आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले पर्यटनस्थळ व ऐतिहासिक ठिकाण आहे. शिवप्रेमींच्या प्रयत्नांमुळे राज्यातील दुर्गप्रेमींपर्यंत गडाची माहिती पोहोचू लागली आहे.माणिकगडचे महत्त्व : माणिकगड हा साधारणत: १६५७-५८ च्या दरम्यान स्वराज्यात सामील झाला. शाहू महाराजांच्या काळात मानाजी आंग्रे यांचा गडावर अंमल होता. सद्य:स्थितीमध्ये गडावर जुन्या बांधकामाचे अवशेष आढळतात. चुन्याचा घाणा, तटबंदी, बुरूज, ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या तसेच इतर अवशेषांसह पायथ्याशी सुस्थितीतील हनुमान मंदिर आहे.‘स्वराज्याचे वैभव’ या बॅनरखाली समविचारी शिवप्रेमींनी तीन वर्षांपूर्वी माणिकगड संवर्धनाचे काम सुरू केले आहे. पावसाळा संपला की महिन्यातून किमान दोन दुर्गसंवर्धन मोहिमा आयोजित केल्या जातात. माहिती फलक लावणे, टाकी साफ करणे व इतर कामे केली जात आहेत. या कामांत स्थानिक नागरिकांचेही उत्तम सहकार्य लाभत आहे. - संदेश तिर्लोटकर, सदस्य, स्वराज्याचे वैभव

टॅग्स :Fortगड