शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

ग्रामपंचायतकाळातील घर वाचविण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष

By नामदेव मोरे | Updated: December 5, 2023 17:49 IST

ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकेच्या अभिलेखातही घराची नोंद आहे.

 नवी मुंबई : शासन सन २००० पर्यंतच्या झोपड्यांनाही संरक्षण देत असताना प्रकल्पग्रस्तांचे ग्रामपंचायतकाळातील घर मात्र अनधिकृत ठरविण्याचा प्रयत्न करत आहे. नेरूळ रेल्वे स्टेशन जवळ ग्रामपंचायत काळातील घर क्रमांक १ व महानगरपालिकेमधील घर क्रमांक ७१७ आणि ७१८ चे अस्तित्व नष्ट कण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिडकोने हा भूखंड निविदा काढून विकला असून महानगरपालिकेने बांधकाम परवानगीही दिली आहे. यामुळे आता वडिलोपार्जित घर वाचविण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी सनदशीर मार्गाने लढा सुरू केला आहे.

शासनाने सुरुवातीला ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहत व नंतर नवी मुंबई वसविण्यासाठी शेतकऱ्यांची सर्व जमीन संपादित केली. या जमिनीवर एमआयडीसी व नियोजित शहर वसविले. शेकडो एकर जमिनीवर झोपड्यांची उभारणी केली असून सुरुवातीला १९९५ व नंतर सन २००० पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. अनधिकृत झोपड्या अधिकृत झाल्या पण प्रकल्पग्रस्तांना मात्र त्यांची घरे नियमित करण्यासाठी अजून संघर्ष करावा लागत आहे.  

नेरूळ रेल्वे स्टेशनजवळ रामचंद्र कमळ्या पाटील यांचे ग्रामपंचायत काळातील घर होते. ग्रामंपचायतीच्या अभिलेखात या घराला १ क्रमांक देण्यात आला आहे. या घराची घरपट्टी भरली जात होती. रामचंद्र पाटील यांच्या निधनानंतर पत्नी नागूबाई रामचंद्र पाटील यांच्या नावावर या घराची नोंद करण्यात आली. महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर १ जानेवारी १९९२ मध्ये हे घर महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्यात आले आहे. या घराला घर क्रमांक ७१७ व ७१८ असा नोंदणी क्रमांक देण्यात आला आहे. तेव्हापासून आतापर्यंत या घराचा मालमत्ता कर भरण्यात येत आहे.

नेरूळ गावातील रहिवासी नागूबाई रामचंद्र पाटील यांच्या नावावर असलेल्या घराची देखभाल त्यांच्या दोन्ही मुली करत आहेत. या घराच्या परिसरामध्ये त्यांनी वृक्ष लागवडही केली होती. पण सिडकोने हे घर अनधिकृत ठरवून त्यावर कारवाई करण्याची नोटीस दिल्यानंतर घर वाचविण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयानेही बांधकाम हटविण्यास स्थगिती दिली आहे.परंतु घर असलेला भूखंड सिडकोने निविदा काढून विकला आहे. महानगरपालिकेनेही या ठिकाणी संबंधितांना बांधकाम परवानगी दिली आहे. यामुळे वडिलोपर्जीत घर वाचवण्यासाठी नागूबाई यांची मुलगी मंदा शांताराम पाटील व परिवारातील सदस्य लढा देत आहेत. आमचे घर आम्हाला मिळावे आमच्यावर अन्याय केला जाऊ नये अशी मागणी केली असून सनदशीर मार्गाने निकराचा लढा देण्याचा निर्धार केला आहे. ग्रामपंचायतीमधील घर क्रमांक १ ला महानगरपालिकेत हस्तांतर झाल्यानंतर घर क्रमांक ७१७ व ७१८ अशी नेांदणी मिळालेली आहे. या घराचा मालमत्ता करही नियमित भरला जात आहे. आमचे वडिलोपार्जीत घर अनधिकृत ठरवून आम्हाला बेघर करण्याचा डाव आहे. आम्हाला आमच्या हक्काच्या घरासाठी संघर्ष करावा लागत आहे.

- मंदा शांताराम पाटील, प्रकल्पग्रस्त

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई