शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

विस्कळीत रेल्वे सेवेचा रस्ते वाहतुकीवर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 02:39 IST

नवी मुंबई : बेलापूर रेल्वेस्थानकावरून पनवेलच्या दिशेने जाणा-या फलाटावर ओव्हरहेड वायर तुटल्याने सलग चार तास हार्बरमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

प्राची सोनवणे नवी मुंबई : बेलापूर रेल्वेस्थानकावरून पनवेलच्या दिशेने जाणा-या फलाटावर ओव्हरहेड वायर तुटल्याने सलग चार तास हार्बरमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. बेलापूर स्थानकाच्या फलाट क्रमांक एक वरून जाणाºया लोकलमध्ये सकाळी ९.४० वाजता करंट पास झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली त्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याच्या कारणास्तव लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या कारणास्तव सीएसएमटी ते पनवेल दरम्यानच्या वाहतूक सेवेवरही याचा परिणाम झाला. उरण-बेलापूर मार्गाच्या कामामुळे गेले चार दिवस ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, पाचव्या दिवशीदेखील प्रवाशांना वाहतुक समस्येला तोंड द्यावे लागले.रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन तासांनी वाहतूक पूर्ववत होणार असल्याने अनेक प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब केला. पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाºया प्रवाशांनी खासगी वाहनांचा आधार घेत इच्छित ठिकाण गाठले. या वेळी खासगी वाहनचालकांनी संधीचा गैरफायदा घेत प्रवाशांची लूट केली. ऐन कार्यालयीन वेळेत झालेल्या या तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अप आणि डाउन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने या वेळेत रेल्वेस्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. याचा परिणाम ट्रान्सहार्बर मार्गावरही झाला असून, या मार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरही लोकलचे वेळापत्रक बिघडल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. दुपारनंतर लोकल वाहतूक सुरळीत झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.>खासगी वाहनांंचा आधारपनवेल तसेच बेलापूर येथून सीएसएमटीच्या दिशेने जाणाºया नोकरदारवर्गाला खासगी वाहनांचा पर्याय निवडावा लागला. या वेळी खासगी वाहनचालकांकडून लूट करण्यात आल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसल्याची नाराजी या वेळी व्यक्त करण्यात आली. हार्बरमार्गावर सतत तांत्रिक बिघाड येत असल्याने येथील प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याची माहिती प्रवासी संघटनेने दिली. रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून, याकडे गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया प्रवासी संघटनेने व्यक्त केली. महामार्गावर अपघात झाल्याने महामार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती, त्यामुळे नोकरदारवर्गाला मात्र लेटमार्क लागला.>ब्लॉकनंतरही वाहतुकीचा खोळंबाउरण-बेलापूर रेल्वेचे काम जलद गतीने सुरू असल्याने चार दिवस ट्राफिक ब्लॉक घेऊन या मार्गावरील रूळ जोडण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्या दरम्यान जोडण्यात आलेल्या वायरिंगमध्ये काही तांत्रिक बिघाड आल्याने पुन्हा या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाल्याने प्रवासी हैराण झाले. वीकेण्ड आणि नाताळच्या सुट्टीमुळे या दिवसांत प्रवाशांचे फारसे हाल झाले नाहीत. मात्र, मंगळवारी पेंटाग्राफ तुटल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. गर्दीच्या वेळेत झालेल्या या बिघाडाने हार्बर मार्गावरील वाहतूक कोलमडली होती, याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे.