शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रॉबेरीची आवक वाढली, दिवसाला १५०० क्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 02:28 IST

नवी मुंबई : नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान बाजारात स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला १५०० क्रेट स्ट्रॉबेरीची आवक होते.

प्राची सोनवणे नवी मुंबई : नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान बाजारात स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला १५०० क्रेट स्ट्रॉबेरीची आवक होते. वाई, पाचगणी, महाबळेश्वर, सातारा परिसरातील स्ट्रॉबेरीला गेल्या काही दिवसांपासून मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली. यामध्ये विंटर, चार्लीसारख्या प्रकाराला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली.वाई, महाबळेश्वर येथून आलेल्या स्ट्रॉबेरीच्या चांगल्या प्रतीच्या दोन किलोंच्या बॉक्ससाठी २०० ते २६० रुपये, तर दुय्यम प्रतीच्या स्ट्रॉबेरीसाठी १५० ते १८० रु पये मोजावे लागत आहेत. थंडीचा हंगामा सुरू झाल्यापासून बाजारात स्ट्रॉबेरीची आवक सुरू झाली आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे पिके पाण्याखाली आल्याने, गेल्या दोन आठवड्यांपासून थंडी वाढू लागली आहे. थंडीत स्ट्रॉबेरीला रंगही चांगला येतो आणि गोडी अधिक असल्याने ग्राहकांसह व्यापाºयांकडून स्ट्रॉबेरीला अधिक मागणी असते. महाबळेश्वरबरोबर वाई, पाचगणी, भिलारवाडी, सरकलवाडी आदी ठिकाणांहून स्ट्रॉबेरीची बाजारात आवक होत आहे. एपीएमसी घाऊक बाजारपेठेत ६००० ते ९००० रुपये प्रतिक्विंटल दराने स्ट्रॉबेरी उपलब्ध आहेत. चांगल्या प्रतीच्या स्ट्रॉबेरीचे दर हे दुय्यम प्रतीच्या स्टॉबेरीपेक्षा ४० ते ६० रुपयांनी जास्त आहेत. नवी मुंबई परिसरातील आठवडे बाजारांमध्ये स्ट्रॉबेरीची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून महाबळेश्वर, जावली परिसरांतील शेतकरी या ठिकाणी विक्रीसाठी येत आहेत. स्ट्रॉबेरी नाशवंत असल्याने लवकरात लवकरात बाजारात पोहोचविली तरच शेतकºयांना, व्यापाºयांना त्याचा फायदा होतो. मार्र्चपर्यंत स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू राहणार असून जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी स्ट्रॉबेरीचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटले आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे उत्पादन घटल्याने मागणी असातानाही त्यानुसार उत्पादन न झाल्याने गेल्या महिन्यात मात्र आवक मोठ्या प्रमाणात घटली होती.>उत्पादनात ५० टक्के घटअवकाळी पावसाचा फटका स्ट्रॉबेरीला बसला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात घट झाली. गेल्या आठवडाभरापासून वाशीतील एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढली आहे. येत्या काही दिवसांत मागणी आणखी वाढणार असून दरांमध्ये घट होणार नाही. फेब्रुवारीमध्ये स्ट्रॉबेरीची आवक आणखी वाढेल. या रोपाला थंडीची आवश्यकता, तसे हवामान असल्याने आवकही वाढली आहे.- संजय पिंपळे, सचिव, फ्रुट आणि व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनच, एपीएमसी