शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल मनपातील लघुलेखक वेतनापासून वंचित, कर्मचा-याची न्यायासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 01:56 IST

पनवेल महापालिकेमध्ये ठेकेदाराच्या माध्यमातून लघुलेखकाची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित लघुलेखकाने पालिकेच्या निवडणुकीच्या बैठका व नंतर पाच महासभांचे कामकाज पाहिले.

- वैभव गायकरपनवेल : पनवेल महापालिकेमध्ये ठेकेदाराच्या माध्यमातून लघुलेखकाची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित लघुलेखकाने पालिकेच्या निवडणुकीच्या बैठका व नंतर पाच महासभांचे कामकाज पाहिले. यासाठीचे एकूण १ लाख २१ हजार रुपये मानधन अद्याप त्यांना देण्यात आलेले नाही. केलेल्या कामाचा मोबदला मिळावा, यासाठी लखुलेखक संजय पाटील यांनी पाठपुरावा सुरू केला आहे; परंतु प्रशासन सर्व जबाबदारी ठेकेदारावर झटकत असल्यामुळे संबंधितांना न्याय कोण देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.आयुक्त, महापौर तसेच विरोधी पक्षनेत्यांना यासंदर्भात पत्र लिहून संबंधित लघुलेखकाने गंभीर आरोप पालिका प्रशासनावर केले आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेपासून संबंधित लघुलेखक पालिकेचे कामकाज करीत आहे. या कामकाजात पालिकेच्या निर्मितीसाठी तत्कालीन कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीचे सर्व कामकाज, निवडणुकीबाबत झालेल्या सभा, पाच महासभा आदींचे काम या एका लघुलेखकाने केले. या कामाचा मोबदला म्हणून पालिकेमार्फत प्रत्येक महासभा १५ हजार रु पये, निवडणुकीच्या तीन सभांचे २१ हजार रुपये, तसेच पालिका निर्मिती स्थापनेसाठी समितीच्या कामकाजाचे २० हजार रु पये, असे एकूण १२१००० रु पये पालिका देणे असल्याचे, हे कामकाज पाहणारे लघुलेखक संजय पाटील यांचे म्हणणे आहे. यापैकी ४४५०० रु पये पालिकेने देऊ केले आहेत. मात्र, उर्वरित ७६५०० रु पये देण्यास पालिका टाळाटाळ करीत असल्याचा आरोप महापौरांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. विशेष म्हणजे, इतिवृत्त लिहिण्यासाठी कमीत कमी आठ ते दहा लघुलेखक लागत असतानाही केवळ एका लघुलेखकाची नेमणूक करून पालिकेने वेळोवेळी वेळ मारून घेतली आहे. पालिकेला मनुष्यबळ पुरविणारे आदेश नाईक यांनी संजय पाटील यांची नियुक्ती लघुलेखक म्हणून केली होती. विशेष म्हणजे, मागील महासभेत या कंत्राटदारावर ठपका ठेवत महापौरांनी या कंत्राटदाराच्या निलंबनाचे आदेश दिले होते.पनवेल महानगरपालिकेच्या प्रत्येक महासभेत इतिवृत्तातील चुका, इतिवृत्त वेळेवर मिळत नसल्याची तक्र ार सत्ताधारी, तसेच विरोधकांनी वेळोवेळी केली आहे. मात्र इतिवृत्त लिहिण्याचे काम पाहणाºया संजय पाटील यांनी पालिकेच्या वेळकाढू धोरणाचा पंचनामा केला असल्याचे या पत्रामधून उघड झाले आहे.मी पालिका सचिवपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वीपासून संजय पाटील हे लघुलेखक म्हणून कामकाज पाहतात. संबंधित विषय हा ठेकेदार व लघुलेखक यांचा अंतर्गत विषय आहे. त्यांची नियुक्ती ठेकेदारांमार्फत झाली आहे. तसेच यासंदर्भात कागदोपत्री माझ्यासमोर काहीच आले नसल्याने ते समोर आल्याशिवाय मी या विषयावर काही बोलू शकत नाही.- अनिल जगधणे,सचिव, पनवेल महानगरपालिकापालिका सचिवांच्या मार्फत मला वेळोवेळी महासभेच्या कामकाजाच्या सूचना दिल्या जात होत्या. ठरल्याप्रमाणे मला माझ्या कामाचा मोबदला मिळायला हवा. या संदर्भात महापौर, आयुक्त व विरोधी पक्षनेते आदींना पत्र दिले आहे.- संजय पाटील,तक्रारदार, लघुलेखक

टॅग्स :panvelपनवेल