शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
3
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
4
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
5
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
6
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
7
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
8
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
9
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
10
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
11
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
12
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
13
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
14
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
15
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
16
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
17
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
18
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
19
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
20
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार

गौण खनिज उत्खननातून राज्य होणार मालामाल; तिजोरीत ७,२९५ कोटींची भर पडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 10:09 IST

जमीन महसूल आणि रेती, खडीसह इतर खनिजांच्या उत्खननापासून राज्याला यंदा मोठा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई :  जमीन महसूल आणि रेती, खडीसह इतर खनिजांच्या उत्खननापासून राज्याला यंदा मोठा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. वित्त विभागाने यंदा  महसूल विभागास गौण खनिजांच्या उत्खननापासून तब्बल ७,२९५ कोटी १० लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. यात सर्वाधिक विकासकामे सुरू असलेल्या महामुंबईसह काेकण विभागाला राज्यात सर्वाधिक ३,३९५ कोटींचे लक्ष्य दिले आहे.

यात जमीन महसुलातून कोकण विभागाचे २,७९३.१६ कोटी आणि गौण खनिजांच्या उत्खननातून ६०२ कोटी असे एकूण ३,३९५ कोटी १६ लाखांचे उद्दिष्ट आहे. राज्य शासनाला २०२३-२४ या वर्षांत जमीन महसूल आणि रेती, खडीसह इतर खनिजांच्या उत्खननापासून कोणत्या महसूल विभागास किती उत्पन्न मिळेल, याचा प्रस्ताव वित्त विभागाने महसूल विभागास दिला आहे. त्यानुसार राज्यात कोकण विभागानंतर पुणे विभागास सर्वाधिक १,०७३ कोटी ६० लाखांचे उद्दिष्ट दिले आहे. यात जमीन महसुलातून ५५० कोटी आणि गौण खनिज उत्खननातून अपेक्षित असलेल्या ५२३ कोटी ६० लाख रुपये महसुलाचा समावेश आहे. सर्वांत कमी ४९६ कोटी ४० लाखांचे उद्दिष्ट अमरावती महसूल विभागास दिले आहे.

कोकणातून ३,३९५ कोटींचे उद्दिष्ट

कोकण विभागात राज्यातील सर्वाधिक विकासकामे सुरू असलेला महामुंबईचा परिसर मोडतो. येथे जमिनीला सोन्याचा भाव आहे. याशिवाय बिल्डरांचे मोठमोठे प्रकल्प, टाऊनशिपसह एमएआरडीए, सिडको, एमएसआरडीसह विविध महापालिकांकडून सुरू असलेले मेट्रो, रस्ते, उड्डाणपूल, सागरी पूल, कोस्टल रोड, महामार्ग, ग्रोथ सेंटर, रेल्वे मार्ग, विमानतळ आणि बुलेट ट्रेनची कामे या भागात सुरू आहेत. 

विभागनिहाय अपेक्षित महसूल (आकडे कोटीत)

    विभागाचे नाव    जमीन महसूल    गौण खनिज            एकूण    कोकण विभाग    २७९३.१६    ६०२    ३३९५.१६    नाशिक विभाग    २८९.८०    ३६९.६०    ६५९.४०    पुणे विभाग    ५५०.००    ५२३.६०    १०७३.६०    औरंगाबाद विभाग    १८०.५०    ५०९.६०    ६९०.१०    अमरावती विभाग    १५४.८०    ३४१.६०    ४९६.४०    नागपूर    २८३.१०    ४५३.६०    ७३६.७०    जमाबंदी भूमिअभिलेख    ००    ००            २४३.७४    एकूण    ४,४९५.१०    २,८००        ७,२९५.१०