शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमध्ये खाजगी रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्र सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 00:19 IST

शासकीय केंद्रावरील वाढती गर्दी धोक्याची

पनवेल : पालिका क्षेत्रातील सर्वांत मोठ्या खारघर नोडमध्ये केवळ तीन शासकीय केंद्रांवर कोविड लसीकरण केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांवरील वाढती गर्दी व शहरातील लोकसंख्येनुसार वाढते रुग्ण लक्षात घेता खाजगी रुग्णालयांत कोविड लसीकरण केंद्रे सुरू करण्याची मागणी खारघरचे नगरसेवक रामजी बेरा यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना शनिवार, ३ एप्रिल रोजी लिहिलेल्या पत्रात केली आहे.बेरा यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की पनवेल पालिकेने खाजगी व शासकीय रुग्णालयांत लसीकरणाला सुरुवात केली आहे. अद्यापपर्यंत ५० हजार लसीकरणाचा आकडादेखील पालिकेने पूर्ण केला आहे हे कौतुकास्पद आहे. मात्र शहरातील सर्वांत मोठा नोड म्हणून ओळखला जाणाऱ्या खारघर शहरात केवळ शासकीय केंद्रावर हे लसीकरण केले जात आहे. शहरात एकाही खाजगी रुग्णालयात लसीकरण सुरू नसल्याने सध्या शासकीय केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. ही गर्दी कोरोना प्रादुर्भावास कारणीभूतही ठरू शकते. खारघर शहरात टाटा एक्ट्रेक्ट सेंटर, येरळा मेडिकल आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण केले जात आहे. केवळ तीन शासकीय केंद्रांवर लसीकरण होत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या रांगा लागत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनादेखील रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. या गोष्टींचा पालिकेने विचार करून खाजगी रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात करण्याची गरज असल्याचे नगरसेवक बेरा यांचे म्हणणे आहे.४५च्या पुढील सर्व वयोगटातील नागरिकांचे आता लसीकरण करण्यात येत असल्याने लसीकरणासाठी मोठी गर्दी वाढणार असल्याने पालिकेने तत्काळ उपाययोजना राबवून खारघर शहरात खाजगी रुग्णालयांत लसीकरण केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी बेरा यांनी आयुक्त देशमुख यांच्याकडे केली आहे. शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शहरात लसीकरणाचे केंद्र वाढविण्याची गरज आहे. त्यादृष्टीने महापालिकेने नियोजन करणे गरजेचे आहे.