शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल मनपा हद्दीत स्वच्छ प्रभाग स्पर्धेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 01:37 IST

शासनाचे स्वच्छ भारत अभियान देशात जोरदार सुरू आहे. या अंतर्गत यावर्षी देशभर स्वच्छ सर्वेक्षण २0१८ सुरू आहे. यामुळे देशातील शहरांचे रँकिंग ठरणार आहे.

पनवेल : शासनाचे स्वच्छ भारत अभियान देशात जोरदार सुरू आहे. या अंतर्गत यावर्षी देशभर स्वच्छ सर्वेक्षण २0१८ सुरू आहे. यामुळे देशातील शहरांचे रँकिंग ठरणार आहे. यामुळे पनवेल शहर सुद्धा रँकिंगमध्ये मागे पडू नये म्हणून शासनाने सुद्धा स्वच्छ वॉर्ड स्पर्धा सुरू केली आहे. यासाठी पनवेल महानगरपालिकेत देखील प्रभागनिहाय स्वच्छता उपक्र म करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पालिका प्रशासनासोबत नगरसेवक देखील या उपक्र मात सहभागी झाले असून १४ रोजी विविध प्रभागात यासंदर्भात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.रोहिंजण, पेंधर, नावडे व कामोठे भागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी देखील या अभियानात सहभाग घेतला. त्यांच्यासोबत शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे, नगरसेवक हरेश केणी, ज्ञानेश्वर पाटील हे सहभागी झाले होते.रस्त्यावर पडलेला कचरा उचलून, दर्शनीय भाग असलेल्या भिंतीवर रंगकाम करून स्वच्छतेचा संदेश यावेळी देण्यात आला. खारघर शहरात देखील हा उपक्र म राबविण्यात आला. भाजपा नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, शत्रुघ्न काकडे, शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला मोर्चा सरचिटणीस बिना गोगरी, समीर कदम, किरण पाटील, गीता चौधरी, गुरु नाथ म्हात्रे, वासुदेव पाटील, दीपक शिंदे, पालिका विभाग अधिकारी श्रीराम हजारे, अनिल कोकरे, आदींनी या उपक्र मात सहभाग घेत भित्तिचित्रे काढली. यावेळी स्वच्छतेचा संदेश देत, प्लास्टिकचा वापर टाळा, बेटी पढाओ बेटी बचाओ असे संदेश स्वत: भिंतीवर लिहून नागरिकांना विविध सामाजिक संदेश दिले.पनवेलमध्ये देखील प्रभाग क्र मांक १८ मध्ये विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी १५ रोजी उपक्र म हाती घेतला आहे. आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली.पनवेल महानगर पालिकेत एकूण २० प्रभाग आहेत. स्वच्छ प्रभाग स्पर्धेत प्रथम क्र मांक पटकाविणाºया त्या प्रभाग नगरसेवकाला पालिका सन्मानित करणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी पनवेल महानगर पालिका सज्ज झाली आहे.