शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत राबविणार एसआरए योजना, सर्वांना सहकार्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 00:07 IST

SRA scheme : नवी मुंबईमध्ये दिघा ते बेलापूरपर्यंत अनेक ठिकाणी झोपडपट्टी आहेत. सर्वेक्षण झालेल्या झोपड्यांच्या पुनर्बांधणीसाठी शासनाने एमएमआर रिजनसाठी स्वतंत्र प्राधिकरण तयार केले आहे.

नवी मुंबई : शासनाने मुंबई महानगरपालिका प्रदेश क्षेत्रातील ८ पालिका व ७ नगरपालिकांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून नवी मुंबईमध्येही झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येणार आहे. कायद्याच्या कक्षेत राहून झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे मिळवून देण्यात येणार असून, यासाठी राजकारण न करता, सर्वांनी सकारात्मक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले आहे.

नवी मुंबईमध्ये दिघा ते बेलापूरपर्यंत अनेक ठिकाणी झोपडपट्टी आहेत. सर्वेक्षण झालेल्या झोपड्यांच्या पुनर्बांधणीसाठी शासनाने एमएमआर रिजनसाठी स्वतंत्र प्राधिकरण तयार केले आहे. २६ ऑगस्टला याविषयी निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईबाहेरील विभागांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण क्षेत्र लागू करण्यासाठी अभ्यासगटाची शिफारस तत्त्वत: स्वीकारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, राज्यातील इतर प्रमुख शहरातील झोपडपट्ट्यांना झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्यासाठी प्रधान गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र अभ्यासगट नेमला आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे.

नवी मुंबईमध्येही या योजनेंतर्गत झाेपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे विजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. यासाठी चिंचपाडा व इतर काही झोपडपट्टी परिसरातील विकासाची ब्ल्यू प्रिंटही तयार केली आहे. पुनर्विकास कसा असेल, याविषयी सादरीकरणही यावेळी दाखविण्यात आले. शासनाच्या योजनेमुळे कायद्याच्या चौकटीत राहून झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणे शक्य होणार आहे. ऐरोलीचे आजी-माजी आमदार व इतर सर्वांनीच यासाठी सकारात्मक भूमिका ठेवावी. पुनर्वसन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांनी पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त केले.

दिघामधील प्रश्न सोडविण्यासाठी तेथेही एसआरएच्या माध्यमातून विकास करता यावा, यासाठी न्यायालयात भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी ऐरोलीचे शिवसेना जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, माजी नगरसेवक मनोज हळदणकर, जगदीश गवते व इतर पदाधिकारी होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई