शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील पाणीपुरवठा योजनेला गती देणार - लोणीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 05:10 IST

मंत्रालयात बैठक : बबनराव लोणीकर यांचे आश्वासन

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना वेळेत व पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी महानगरपालिकेच्या हद्दीतील पाणीपुरवठा योजनांच्या कामाला गती देण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.

पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी लोणीकर म्हणाले की, पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील पाणीपुरवठा योजना सुरळीत ठेवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत प्रयत्न करण्यात येत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइन जुन्या झाल्या असल्याने, पाणीगळतीचे प्रमाण वाढले आहे. गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी एका महिन्याच्या आत प्रयत्न केले जातील. पाणीपुरवठा योजनांना होणारा खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. महानगरपालिकेच्या हद्दीत वेळीच व पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा क्र मांक -३ तयार करण्यात आली असून, योजनेची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर कविता चौतमोल, पनवेल म.न.पा.चे सभागृहनेते परेश ठाकूर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, पनवेल महानगरपालिकेचे वपाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.आराखडे तयारमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत अमृत योजनेतून सादर करण्यात आलेल्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २९ गावांच्या शहरी निकषाप्रमाणे दरडोई १३५ लिटर / दिन / माणसी या प्रमाणे सेवास्तर उंचविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेची अंदाजपत्रके व आराखडे तयार करण्यात आले आहेत. ते नगर विकास विभागाला पाठविण्याच्या सूचनाही या वेळी लोणीकर यांनी दिल्या.

टॅग्स :Babanrao Looneykarबबनराव लोणीकरWaterपाणीNavi Mumbaiनवी मुंबई