शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
3
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
4
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
5
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
6
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
7
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
8
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
9
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
10
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
11
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
12
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
13
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
14
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
15
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
16
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
17
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
18
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
19
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
20
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता

साडेबारा टक्के भूखंड वाटपाला गती

By admin | Updated: October 5, 2016 03:22 IST

साडेबारा टक्के भूखंडांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याच्या दृष्टीने सह व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनी कंबर कसली आहे

कमलाकर कांबळे , नवी मुंबई साडेबारा टक्के भूखंडांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याच्या दृष्टीने सह व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनी कंबर कसली आहे. विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेल्या प्रकरणांची पात्रता तपासणीसाठी ४00 प्रकरणे सध्या विचाराधीन आहेत. त्यापैकी काही संचिका सोडतीच्या प्रक्रियेत तर काही पुनर्रावलोकनाच्या टप्प्यात आहेत. मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील १५२ संचिकांची यादी पात्रता तपासणीसाठी जाहीर करण्यात आली आहे. एकूणच सिडकोने रखडलेल्या साडेबारा टक्के भूखंड वाटप योजनेला पुन्हा गती दिल्याने प्रकल्पग्रस्तांसह गुंतवणूकदार आणि विकासकांनी समाधान व्यक्त केले आहे.नवी मुंबईच्या उभारणीसाठी नवी मुंबई, उरण आणि पनवेल परिसरातील ९५ गावांतील जमिनी संपादित करण्यात आल्या. या संपादित जमिनीच्या मोबदल्यात संबंधित प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के विकसित भूखंडाचे वाटप केले जाते. १९९४ पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. परंतु विविध कारणांमुळे सुरुवातीपासूनच ही योजना वादग्रस्त ठरली आहे. विकासक आणि दलालांनी संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून या योजनेच्या आडून नियमबाह्यरीत्या मोठ्या प्रमाणात भूखंड लाटले आहेत. याचा पूर्वानुभव लक्षात घेवून सिडकोच्या संबंधित विभागाकडून प्रलंबित प्रकरणे निकाली काढताना अत्यंत सावधगिरी बाळगली जात आहे. एकूणच सिडकोच्या कुप्रसिध्दीला कारणीभूत ठरलेला हा विभागच बंद करण्याची योजना व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी आखली आहे. प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार सह व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनी रखडलेल्या भूखंड वाटप प्रक्रियेला गती दिली आहे. सध्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेल्या संचिकांचे पुनर्रावलोकन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील १५२ संचिकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात संचिकानिहाय इरादीत भूखंडाचा तपशील देण्यात आला आहे. संबंधित संचिकाधारकांनी याबाबत काही आक्षेप असल्यास किंवा दुबार भूखंड वाटप झाले असल्यास त्यासंदर्भात पंधरा दिवसांत संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील आणखी २६८ संचिका पात्रता फेरीत आहेत. या संचिकांची भूखंड पात्रता सिध्द करण्यासाठी संबंधित प्रकल्पग्रस्त व त्यांच्या वारसाचे बांधकाम अहवाल मागविण्यात आले आहेत.