शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील बेजबाबदारांवर विशेष पथकांची राहणार नजर! १५५ जणांचा समावेश असलेली ३१ पथके कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 09:40 IST

१६ ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एका दिवसातील कोरोना बाधितांच्या संख्येने ३०० चा आकडा पार केला असून, मागील तीन ते चार दिवसात कोरोनाचा आलेख झपाट्याने वाढत आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिकेच्या १५५ जणांचा समावेश असलेली ३१ विशेष दक्षता पथकांची करडी नजर असणार आहे.१६ ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एका दिवसातील कोरोना बाधितांच्या संख्येने ३०० चा आकडा पार केला असून, मागील तीन ते चार दिवसात कोरोनाचा आलेख झपाट्याने वाढत आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता कोरोना सुरक्षा नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याचे दिसून येत असून, बेजबाबदार नागरिकांवर महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. याकरिता प्रत्येक विभाग कार्यालयनिहाय पोलिसांसह दक्षता पथके नियुक्त करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच पोलिसांमार्फतही स्वतंत्ररित्या कारवाई केली जात आहे. तथापि या कारवाया लोकसंख्येच्या मानाने कमी असल्याने याकडे अधिक बारकाईने लक्ष केंद्रीत करीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रत्येक पथकात ५ व्यक्ती अशा १५५ जणांची ३१ विशेष दक्षता पथके कार्यान्वित करण्याचे निश्चित केले आहे. ही विशेष पथके संपूर्ण महापालिका क्षेत्रातील कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर करडी नजर ठेवणार आहेत. प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रात सकाळच्या सत्रासाठी १ व रात्रीच्या सत्रासाठी १ अशी २ पथके कार्यान्वित असणार आहेत. विभाग कार्यालय क्षेत्रासाठी नियुक्त पथकांव्दारे लग्न व इतर समारंभ तसेच वर्दळीची ठिकाणे येथे कोरोना नियमांचे पालन होते की नाही, यावर बारीक लक्ष ठेवले जाणार असून, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आयुक्तांनी तातडीने ही प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. याशिवाय कोरोना प्रसाराचा सर्वाधिक धोका असणाऱ्या एपीएमसी मार्केट क्षेत्रासाठी ५ पथके तिन्ही शिफ्टमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर वॉच ठेवणार आहेत. 

१५५ जणांचा समावेश असलेली ही विशेष दक्षता पथके कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी समर्पित भावनेने काम करणार आहेत. दंडात्मक रक्कम वसुलीपेक्षा नागरिकांना कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करण्याची सवय लागणे, हा पथके स्थापन करण्यामागील मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी कोरोनाचा वाढता धोका ओळखून गाफील न राहता सुरक्षा नियमांचे व त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावे.    - अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका