नवी मुंबई : सागरी सुरक्षेसाठी महत्त्वाचा दुवा असलेल्या मच्छीमार बांधवांसह सागररक्षक यांचा प्रबोधन मेळावा वाशीत संपन्न झाला. त्यास ७०० हून अधिकांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यांना सागरातील धोक्यासह इतर आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.समुद्रमार्गे मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांकडून सागरीसुरक्षेवर विशेष लक्ष दिले जात आहे. याकामी तटरक्षक दल, मच्छीमार बांधव तसेच ग्रामरक्षक दल यांचेही पोलिसांना सहकार्य होत आहे. मासेमारीच्या निमित्ताने खाडी अथवा समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांना कोणतीही संशयित बाब नजरेस पडल्यास त्याची पोलिसांना माहिती मिळाली पाहिजे, याच उद्देशाने पोलिसांकडून त्यांच्यासोबतचा सलोखा वाढवला जात आहे. मात्र, मागील काही वर्षांत पोलीस आणि मच्छीमार यांतला सुसंवाद दुरावला होता. तो पुन्हा जुळवून आणण्याच्या उद्देशाने रायझिंग डेच्या निमित्ताने विशेष शाखा पोलिसांच्या वतीने त्यांचा प्रबोधन मेळावा घेण्यात आला. शुक्रवारी सकाळी वाशीत झालेल्या या मेळाव्यास ७०० हून अधिक मच्छीमार बांधव, सागररक्षक तसेच ग्रामरक्षक दलाचे सदस्य उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमास कोळी महासंघाचे अध्यक्ष तथा आमदार रमेश पाटील, पोलीस आयुक्त संजय कुमार, सहआयुक्त राजकुमार व्हटकर, विशेष शाखा उपायुक्त सुरेश मेंगडे, परिमंडळ उपायुक्त पंकज डहाणे आदी उपस्थित होते. या वेळी आमदार पाटील यांनी मच्छीमार बांधवांसाठी दिल्या जाणाºया बायोमेट्रिक कार्डची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. मासेमारीसाठी समुद्रात दूरवर गेलेल्या मच्छीमारांना अनेकदा सागरी पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागते, त्याकरिता मच्छीमारांकडे बायोमेट्रिक कार्ड असणे आवश्यक आहे; परंतु बहुतेक जणांकडे ते नसल्याने त्यांना मासेमारीसाठी समुद्रात जाण्यावरही मर्यादा येत असून, कायदेशीर अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे.कार्यक्रमप्रसंगी विशेष शाखा उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सदर प्रबोधन मेळाव्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. मच्छीमार बांधव, सागररक्षक दल तसेच ग्रामरक्षक हे पोलिसांचे उत्तम मित्र आहेत. त्यांच्या सतर्कतेमुळे एखादा गंभीर गुन्हाही घडण्यापूर्वीच टाळला जातो. यामुळे त्यांचा पोलिसांप्रति विश्वास वाढवण्यासाठी हा मेळावा घेण्यात आल्याचेही मेंगडे यांनी सांगितले. या वेळी समुद्र अथवा खाडीत बुडालेल्यांचे प्राण वाचवण्यात तसेच इतर कामी पोलिसांना मदत करणाºया आठ सागररक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.>मच्छीमारांना आवाहनमच्छीमारांनी समुद्रातील प्रत्येक गैरहालचाल पोलिसांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत करण्यात आलेल्या १०९३ या हॉटलाइनची माहिती पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी उपस्थितांना दिली. तसेच सागरात कोणत्या प्रकारचे धोके उद्भवू शकतात, याविषयीही त्यांना माहिती दिली. तर पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून समुद्रात वावरत असताना, मच्छीमारांनी त्यांच्या समस्याही कळवाव्यात, असेही आवाहन त्यांनी ेकेले.
सागरी सुरक्षेवर पोलिसांचे विशेष लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 01:18 IST