शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिल्लक घरांची लवकरच विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 04:25 IST

शहराची निर्मिती करताना सिडकोने विविध विभागांत दीड लाखांपेक्षा अधिक घरांची निर्मिती केली आहे. यातील शेकडो घरे अद्यापि विक्रीविना पडून आहेत,

नवी मुंबई : शहराची निर्मिती करताना सिडकोने विविध विभागांत दीड लाखांपेक्षा अधिक घरांची निर्मिती केली आहे. यातील शेकडो घरे अद्यापि विक्रीविना पडून आहेत, अशा घरांचा सिडकोने अलीकडेच सर्व्हे केला आहे. आता या घरांची विक्री करण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून चाचपणी सुरू असल्याचे समजते.मागील ४० वर्षांत सिडकोने नवी मुंबईसह पनवेल व उरण तालुक्यात १२ नोड विकसित केले आहेत. हे नोड विकसित करताना विविध आर्थिक घटकांसाठी दीड लाखांपेक्षा अधिक सदनिका बांधल्या आहेत. या सदनिकांची विक्री त्या-त्या वेळच्या धोरणानुसार करण्यात आली; परंतु आजही अनेक सदनिका विक्रीविना पडून आहेत. तर काही सदनिकांची परस्पर विक्री केल्याचे आढळून आले आहे. काही महिन्यांपूर्वी यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी सिडकोने बांधलेल्या सर्व सदनिकांचा डेटा गोळा करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहराच्या विविध भागांत ८००पेक्षा अधिक मालमत्ता विक्रीविना पडून असल्याचे दिसून आले आहे. यात निवासी आणि वाणिज्य मालमत्तांचा समावेश आहे.

टॅग्स :cidcoसिडकोHomeघर