शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील शिल्लक घरांची लवकरच विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:40 IST

सिडकोची कार्यवाही; अडीच हजार मालमत्तांचा समावेश

नवी मुंबई : विविध कारणांमुळे नव्या आणि जुन्या गृहनिर्माण योजनेत विक्रीविना पडून असलेल्या सदनिका आणि व्यावसायिक गाळ्यांची सध्याच्या दराने विक्री करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यासाठी लवकरच अर्ज विक्री केली जाणार आहे. त्यादृष्टीने सिडकोच्या संबंधित विभागाने कार्यवाही सुरू केली आहे.नवी मुंबई शहराची निर्मिती करताना सिडकोने विविध नोड्समध्ये जवळपास १,३५,000 मालमत्ता विकसित केल्या आहेत. यात निवासी आणि वाणिज्यिक मालमत्तांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सुरुवातीच्या काळात विविध उत्पन्न गटातील घटकांसाठी गृहयोजना राबविण्यात आली. काही भागात निवासी संकुले उभारली आहेत. अशा विविध प्रकल्पातील जवळपास अडीच हजार मालमत्ता अद्याप विक्रीविना पडून असल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे. खासगी संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाल्याचा दावा सिडकोने केला आहे. महत्त्वाचे म्हणजे सिडकोच्या अनेक घरांचा मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या.काही इस्टेट एजंट्सनी संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सिडकोच्या शिल्लक मालमत्तांवर डल्ला मारल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी समोर आली आहेत. त्यामुळे सध्या शिल्लक असलेल्या मालमत्तांचा अपहार होऊ नये, यादृष्टीने सिडकोने हे पाऊल उचलले आहे. शिवाय विविध कारणांमुळे विवादात सापडलेल्या मालमत्तांची जैसे थे स्थितीत विक्री करण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी घेतला आहे. त्यादृष्टीने त्यांनी संबंधित विभागाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. या मालमत्तांच्या विक्रीतून सिडकोला जवळपास दीड ते दोन हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई