शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लवकरच सुशोभीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 23:50 IST

पनवेल शहर महापालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका आहे.

पनवेल : पनवेल शहर महापालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका आहे. रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. दीड कोटी खर्चून महाराजांच्या पुतळ्यासह आजूबाजूचा परिसर सुशोभित केला जाणार आहे.दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी या संदर्भात पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव मांडला होता. स्वखर्चाने तयार केलेली पुतळ्याची कलाकृती (डिझाइन) आयुक्तांना या वेळी सादर करण्यात आली होती. या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर या संदर्भात निविदा तयार करण्यात आली. स्थायी समिती समोर हा विषय आल्यानंतर एका कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.पनवेल शहरात महाराजांचा अश्वारूढ पुतळा सध्याच्या घडीला दिमाखात उभा आहे. शहरातील वाहतूक शाखेच्या चौकीलगत शिवाजी चौकात हा अश्वारूढ पुतळा १९८६-८७ मध्ये उभारण्यात आला आहे. मात्र, संबंधित ठिकाणाबाबत कोणतेही सूचनाफलक या परिसरात लावण्यात आलेले नाहीत. पनवेल शहर हे ऐतिहासिक शहर आहे. या संदर्भात ठिकठिकाणी तशा प्रकारच्या नोंदी सापडतात. मात्र, अशा वेळी राज्याचे वैभव असलेल्या महाराजांच्या स्मारकाबाबत प्रशासनाची उदासीनता आजवर दिसून आली आहे. या ठिकाणी अद्याप सीसीटीव्ही बसविण्यात आले नाहीत. स्मारकाची योग्य पद्धतीने देखरेख केली नसल्याने परिसरात घुशी आणि उंदरांचा वावर वाढत चालला आहे. या उद्यानातील फांद्यांची छाटणी वेळेवर होत नसल्याने त्या तुटून महाराजांच्या पुतळ्यावरही पडू शकतात.>वस्तुसंग्रहालयही बांधणारसुशोभीकरणामध्ये छत्रपतींचा जीवनपट उलगडणारी चित्रे, विद्युत रोषणाई, रायगड जिल्ह्याची प्रतिकृती, आबालवृद्धांसाठी वाचनालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आदीचाही समावेश असेल.