पंढरीनाथ कुंभार - भिवंडी
अज्ञात कारणासाठी आपल्या बांधकाम सुरु असलेल्या खोलीत 15 वर्षे वयाच्या प्रदीप या मुलाचा नरबळी देऊन त्याचे पार्थीव तिथेच गाडून टाकण्याचा प्रकार व्यावसायिक प्रकाश वैद्य यांनी केल्याचे उघडकीस आले असून त्यांना व त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे.
खांडपे-चिंचोली येथे राहणारा प्रदीप बेपत्ता झाल्याची तक्रार 2 ऑक्टोबरला दाखल झाली होती. त्यानंतर त्यांच्याच घरासमोर राहणारे वैद्य दाम्पत्य बेपत्ता झाल्याने त्यांच्यावर संशय आला. पोलिसांनी त्यांच्या पत्नीचा शोध लावला व तिला खाक्या दाखवताच तिने आपले पती कुठे आहेत? हे सांगून त्यांनीच ही हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर प्रदीपच्या नातेवाईकांनी व गावक:यांनी वैद्य यांच्या नातेवाईकांना घरात घुसून मारहाण केली. वैद्य हा प्रकाश, योगेश आणि रोहित अशी तीन नावे धारण करून येथे राहत होता. त्याने कबुली देताच पोलिसांनी नायब तहसिलदारांसह गंगाराम पाडा येथील वैद्य याच्या बांधकाम सुरु असलेल्या घरी जाऊन तेथील एका खोलीचा कोपरा शोधून प्रदीपचे पार्थिव खोदून काढले. त्याचा गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. अधिक तपास सुरु आहे.