शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

टेकडीचे सपाटीकरण : उलवेतील ब्लास्टिंगमुळे रहिवाशांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 02:39 IST

नवी मुंबई विमानतळाच्या कामासाठी उलवा टेकडीचे सपाटीकरणाचे काम सुरू आहे. टेकडीच्या सपाटीकरणासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग घडविले जात असून स्थानिकांच्या जीवावर हे ब्लास्टिंग बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वैभव गायकरपनवेल : नवी मुंबई विमानतळाच्या कामासाठी उलवा टेकडीचे सपाटीकरणाचे काम सुरू आहे. टेकडीच्या सपाटीकरणासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग घडविले जात असून स्थानिकांच्या जीवावर हे ब्लास्टिंग बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी ब्लास्टिंगमुळे उडालेल्या दगडांमुळे येथील सिद्धार्थनगरमधील रहिवासी व ब्लास्टिंगचे काम करणारे अभियंते, कामगार गंभीर जखमी झाल्याने या गावांचा पुनर्वसनाचा मुद्दा पुढे आला आहे.ब्लास्टिंगमुळे प्रकल्पबाधित गावातल्या घरांना मोठे हादरे बसत आहेत. वारंवार ब्लास्टिंगमुळे येथील ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून सिडकोने प्रथम ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. चार दिवसांपूर्वी वरचा ओवळा ग्रामस्थांनी सिडकोच्या निषेधार्थ ब्लास्टिंगच्या ठिकाणी मोर्चा काढून काम बंद पाडले होते. घरांना बसणाºया रोजच्या हादºयांमुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते. यावेळी स्वत: सिडको अधिकाºयांनी यासंदर्भात बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. ग्रामस्थांनी काढलेल्या मोर्चात आमदार बाळाराम पाटील यांनी लोकांचे जीव गेल्यावर तुम्हाला जाग येणार का? अशा स्पष्ट शब्दात सिडको अधिकाºयांना सुनावले. आमदार बाळाराम पाटील यांच्या याच शब्दाची आठवण शनिवारी घडलेला घटनेने झाली. घटनेत पाच कामगार व सिद्धार्थनगरमधील रहिवासी जखमी झाले असून याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.विमानतळबाधित गावांमध्ये दहा गावांचा समावेश आहे. चिंचपाडा, कोपर,कोल्ही, वाघिवली, वरचा ओवळा, वाघिवली वाडा, गणेशपुरी, तरघर, कोंबडभुजे, उलवा अशी या दहा गावांची नावे आहेत. याठिकाणी सुरू असलेल्या ब्लास्टिंगच्या विरोधात या गावातील रहिवाशांनी वारंवार मोर्चे, आंदोलने, कामबंद आंदोलनाची भूमिका घेतली आहे. सिडकोला अनेक निवेदने देऊन देखील सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.आमदार बाळाराम पाटील यांनी याठिकाणी घडविल्या जाणाºया स्फोटामुळे स्थानिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याचे स्पष्ट शब्दात सिडको अधिकाºयांना सांगितले होते. लोकांचे जीव गेल्यावर सिडको अधिकाºयांना जाग येईल का? अशी संतप्त भावना आमदार पाटील यांनी व्यक्त केली होती. मात्र, शनिवारी झालेल्या ब्लास्टिंगच्या घटनेत आमदार बाळाराम पाटील यांच्या शब्दाची आठवण नक्कीच सिडको अधिकाºयांना झाली असेल. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले, मात्र सुदैवाने अनेकांच्या जीविताचा धोका टळला.दहा गाव संघर्ष समितीची आधी पुनर्वसनची मागणीविमानतळबाधित दहा गावांच्या मिळून स्थापन झालेल्या संघर्ष समितीने शनिवारी घडलेल्या अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. प्रकल्पबाधितांच्या प्रलंबित मागण्या सोडवून आधी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करा त्यानंतर काम सुरु करा, अशी भूमिका नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्पबाधित दहा गाव संघर्ष समितीने घेतली आहे. सोमवारी सिडकोला कामबंद ठेवण्यासाठी निवेदन देणार आहोत. सिडकोने चार दिवसांत यासंदर्भात निर्णय न घेतल्यास मोठे आंदोलन पुकारणार असल्याचे समितीचे अध्यक्ष नाथा पाटील यांनी सांगितले.आमदार बच्चू कडूंचे मुख्यमंत्र्यांना पत्र -प्रकल्पग्रस्तांचे योग्य ते पुनर्वसन व पुन:स्थापना न करता विमानतळ प्रकल्पपूर्व कामे सुरू करण्यात आलेली आहेत. सदर कामे करताना गावाशेजारी जीवघेणे स्फोट घडवून आणले जात असल्याने स्थानिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत विमानतळाची सर्व कामे थांबविण्याची विनंती अचलपूर विधानसभेचे आमदार व प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी २९ डिसेंबर २0१७ रोजी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली होती. मात्र या पत्राची कोणतीच दखल राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आली नाही.