शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

नालेसफाईनंतर गाळ रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:30 IST

कळंबोलीतील रहिवाशांमध्ये नाराजी : सिडकोचे दुर्लक्ष; ठेकेदाराकडून कामात कुचराई

कळंबोली : वसाहतीचे पनवेल महापालिकेकडे हस्तांतर करण्याआधी सिडकोने काही कामे हाती घेतली आहेत. कळंबोली वसाहतीत दहा कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी डागडुजी केली जात आहे. पावसाळी गटारांमधील गाळ-कचरा, माती काढण्यात आली आहे; परंतु गेल्या काही दिवसांपासून काढलेला गाळ रस्त्यावरच पडून आहेत. त्यामुळे ही माती पुन्हा गटारांमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ती सुकल्यामुळे सर्वत्र धूळ उडत आहे. सिडकोचे ठेकेदारावर नियंत्रण नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

कळंबोली वसाहतीला अनेक समस्यांनी वेढले आहे. अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पथदिवे बंदावस्थेत आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापनाची समस्या अद्याप निकाली निघालेली नाही. अशा अनेक अडचणीत कळंबोलीतील रहिवासी सध्या राहत आहेत. त्यातच इतर वसाहतीप्रमाणे कळंबोलीसुद्धा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार काही छोटी-मोठी कामे सिडको करून देणार आहे. त्यासाठी दहा कोटी रुपयांची निविदा काढून एजन्सी नेमण्यात आली आहे.

वसाहतीमध्ये पावसाळी पाणी वाहून नेणारे नाले बंदिस्त करण्यात येणार आहेत. त्यांची मान्सूनपूर्व साफसफाई व्यवस्थित होत नसल्याने ते सर्वच ठिकाणी तुंबत असल्याचे उघड झाले आहे. सिडकोने ही सर्व गटारे माती, चिखल, डेब्रिज, कचरा, प्लास्टिकमुक्त करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने कामाला सुरुवातही केली आहे.ठेकेदाराने सध्या कळंबोली टपाल कार्यालय ते अय्यप्पा मंदिर रस्त्यालगतच्या गटारांची सफाई करण्याचे काम हाती घेतले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात माती-चिखल, गाळ काढण्यात आला असून रस्त्यावर त्याचे ढीग साचले आहेत. याशिवाय एनएमएमटी बस डेपो ते एसबीआय चौकापर्यंत नाले सफाई करण्यात आली आहे. त्यामधील गाळही उचलण्यात न आल्याने अनेक दिवसांपासून रस्त्यालगत पडून आहे. के एल टाइपच्या घरांसमोर सध्या मातीचे ढिगारे दिसू लागले आहेत.

काही ठिकाणी बाहेर काढण्यात आलेला चिखल सुकून गेला आहे. वाहनांची सततची वर्दळीमुळे ही धूळ उडत असून, त्याचा पादचारी आणि आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होत आहे. तसेच बाहेर काढण्यात आलेली माती पुन्हा गटारांमध्ये जात आहे. माती आणि चिखल बाहेर काढल्यानंतर तो त्वरित उचलावा, अशी मागणी रहिवासी राजेंद्र बनकर यांनी केली आहे.

मद्याच्या बाटल्यांचा खचकळंबोली वसाहतीमध्ये पावसाळी गटारांमधील साफसफाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गटारे साफ करीत असताना माती, प्लास्टिक व इतर वस्तू निघतातच; परंतु सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेच्या समोरील गटारामध्ये मोठ्या प्रमाणात बीअर आणि दारूच्या बाटल्या निघाल्या.त्याचा ढीग पदपथावर पडून आहे. शाळेच्या परिसरात रात्रीच्या वेळी मद्यपी मद्यप्राशन करून बाटल्या गटारात फेकून देत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी कळंबोली विकास समितीचे अध्यक्ष प्रशांत रणवरे यांनी केली आहे.