शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

MIDC मधील रस्ता रूंदीकरणादरम्यान वाचविलेल्या वृक्षांची कत्तल

By नामदेव मोरे | Updated: March 10, 2024 14:53 IST

नेरूळ एलपी जवळील प्रकार : चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी

नामदेव मोरे

नवी मुंबई : ठाणे बेलापूर औद्योगीक वसाहतीमध्ये नेरूळ एलपी येथे रस्ता रूंदीकरण करताना वाचविलेल्या वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे.पदपथाला लागून असलेले वृक्ष तोडल्यामुळे परिसरातील नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.            

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. करावे येथे पाणथळ तलावाचे अस्तीत्व धोक्यात आले आहे. खारफुटीची कत्तल करण्यात आली आहे. दुसरीकडे एमआयडीसीमध्येही बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. नेरूळ एलपी पुलाच्या समोर महानगरपालिकेने पदपथाला लागून वृक्षलागवड केली होती. अनेक वृक्ष २० ते २५ फुट उंच वाढले होते. महामार्गाला लागून असलेल्या जोड रस्त्याच्या रूंदीकरणाच्या दरम्यानही या वृक्षांचे अस्तीत्व कायम राहील याकडे लक्ष दिले होते. तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी रूंदीकरणादरम्यान येथील वृक्षतुटणार नाहीत याकडे लक्ष दिले होते. परंतु काही दिवसांपुर्वी अचानक येथील वृक्ष तोडण्यात आले आहेत. या ठिकाणी सुरू होत असलेल्या नवीन कंपनीच्या बांधकामाचा दर्शनी भाग दिसावा यासाठी वृक्षतोड केली जात असल्याची शंका स्थानीक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.          

या वृक्षतोडीविषयी माजी परिवहन समिती सभापती चंद्रकांत आगोंडे यांनीही आक्षेप घेतला आहे. महानगरपालिका आयुक्त, एमआयडीसी प्रशासनाकडे याविषयी लेखी तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. वेळ पडल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही दिला आहे. पदपथाला लागून असलेले वृक्ष कोणत्याही स्थितीमध्ये तोडण्यात येवू नये अशी भुमीका त्यांनी घेतली आहे. वृक्ष तोड करण्यासाठी परवानगी दिलीच कशी. वृक्ष तोड करण्यापुर्वी स्थानीक नागरिकांकडून सुचना व हरकती मागविणे आवश्यक होते. तोडण्यात येणाऱ्या वृक्षांवर सुचना लावणे आवश्यक होते. परंतु अशा प्रकारच्या सुचना कधीच लावण्यात आल्या नव्हत्या. परवानगी न घेता वृक्ष तोड केली असेल तर तत्काळ गुन्हे दाखल करावे. परवानगी दिली असेल तर त्याचीही चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता भुखंडामधील वृक्ष तोडण्यासाठी परवानगी दिली आहे. बाहेरील वृक्षतोडीसाठी परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

महानगरपालिकेनेही दखल घ्यावीनेरूळ एलपी येथे केलेली वृक्षतोड एमआयडीसीच्या क्षेत्रामधील असली तरी वृक्षलागवड महानगरपालिकेने केली होती. यामुळे महानगरपालिका आयुक्तांनीही याविषयी दखल घ्यावी व संबंधीतांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

महानगरपालिकेने रस्ता रूंदीकरण करताना वृक्षतोड होणार नाही याची काळजी घेतली होती. ते वृक्ष अचानक तोडण्यात आले आहेत. पर्यावरणाच्या ऱ्हासास कोण जबाबदार आहे याची चौकशी करावी व संबंधीतांवर कडक कारवाई करावी. प्रशासनाने कारवाई केली नाही तर न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.चंद्रकांत आगोंडे, माजी परिवहन समिती सभापती,नवी मुंबई महानगरपालिका

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईforestजंगल