पनवेल : पनवेलमधील वाघेज वडापावच्या समोरची गल्लीतील त्रिमुर्ती बिल्डींगचा स्लॅब कोसळल्याने वडापाव सेंटरचे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.
या इमारतीमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना इमारत धोकादायक झाल्याने खाली करण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यांनी टाळाटाळ केली होती. अखेर आज रात्री स्लॅब कोसळल्यामुळे त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तसेच विद्युत पुरवठाही खंडीत करण्यात आला आहे. स्लॅब कोसळल्यामुळे जीवित हानी झालेली नाही. मात्र, वेळोवेळी नोटीसा देऊनही काही कुटुंबे या इमारतीत राहत होती. तर काही जणांनी आधीच घरे रिकामी केली होती.
पालिका प्रशासनाने पनवेलमधील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना घर सोडण्याचे आवाहने केले आहे.