शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सहा वाहनांची एकमेकांना धडक , सायन-पनवेल महामार्गावर विचित्र अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:48 IST

सायन-पनवेल महामार्गावर वाशी येथील उड्डाणपुलावर बुधवारी रात्री विचित्र अपघात घडला. मुंबईहून पनवेलकडे जाणारी सहा वाहने एकमेकांवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर वाशी येथील उड्डाणपुलावर बुधवारी रात्री विचित्र अपघात घडला. मुंबईहून पनवेलकडे जाणारी सहा वाहने एकमेकांवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना वाशीतील एमजीएम आणि नेरूळ येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या स्कॉर्पिओ चालकाचे नाव हर्षद पाटील (३४) असे असून तो उरणमधील नवीन शेवा येथे राहणारा आहे. बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हर्षद मुंबईहून स्कॉर्पिओ घेऊन उरण येथे जात होता. सायन-पनवेल मार्गावर वाशी येथील उड्डाणपुलावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हर्षदचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे पुढे जाणाऱ्या वॅगनरला त्याच्या स्कॉर्पिओची जोरदार धडक बसली. या जोरदार धडकेत वॅगनार कार थेट महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणाºया रस्त्यावर गेली, तर धडक देणारी स्कॉर्पिओ जागेवरच बंद पडली. स्कॉर्पिओ अचानक बंद पडल्याने मागून येणारी स्कोडा, गॅस टँकर, डंपर आणि आयटेन गाडीची एकमेकांना धडक बसली. या अपघातात डंपर चालकासह स्कोडा आणि आयटेन कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचे वृत्त समजताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातातील जखमी पल्लवी नायर, दीपक चव्हाण आणि मोहम्मद शाबीर शेख या तिघांना नेरु ळ येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये तर आयटेनमधील अनुरागकुमार सक्सेना (५८), रेखा सक्सेना (५६) आणि डंपर चालक मेहजबीन नुर मोहम्मद शेख या तिघांना वाशीतील एमजीएम रु ग्णालयात दाखल केले. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या स्कॉर्पिओ चालकाला पोलिसांनी ताब्यात घेवून त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.महामार्गावर वाहतूककोंडीया अपघातात वॅगनार, स्कॉर्पिओ, स्कोडा, आयटेन या कारसह गॅसचा टँकर आणि डंपर या वाहनांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. टँकर आणि डंपरच्या मध्ये स्कोडा अडकल्याने तिचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. या अपघातामुळे मध्यरात्रीच्या सुमारास वाशी उड्डाणपुलावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे दोन्ही मार्गावर काही काळ वाहतूककोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करीत अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्याने सकाळपर्यंत वाहतूक सुरळीत झाली.

टॅग्स :AccidentअपघातNavi Mumbaiनवी मुंबई