शहरं
Join us  
Trending Stories
1
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
2
अमेरिकेने जगातील सर्वात शक्तिशाली अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली; काही मिनिटांत शत्रूचा नाश करणार
3
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
4
वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे इंग्लंडला जाणार! विराट-रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर BCCIची मोठी घोषणा
5
फोन आला अन् बाणेर हायवेवर अज्ञाताने वैष्णवीचे बाळ दिले; कुटुंबीयांची माहिती, आजोबा म्हणाले 'आयुष्यभर सांभाळू...'
6
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
7
पाकिस्तानी लष्करप्रमुख धार्मिक कट्टर..; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केली आसिम मुनीरची पोलखोल
8
आरोग्य विमा ३० वर्षांचे होण्याआधीच घ्या, नाहीतर 'महाग' पडेल! जाणून घ्या ७ मोठे फायदे
9
Apara Ekadashi 2025: एकादशीचा उपास निरोगी आयुष्य देणारा; फक्त त्यादिवशी 'हा' पदार्थ टाळा!
10
“आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा”; ठाकरे गटाचे नेते थेट बोलले
11
"लडकियों को में भी देखता हूं, इतना क्या...", अभिनेत्रीकडे एकटक बघत होता, जाब विचारल्यावर म्हणाला...
12
हृदयद्रावक! भावाच्या जीवाची भीक मागत होती बहीण; पण कोणीच केली नाही मदत, झाली हत्या
13
विमानावर वीज पडली तर काय होते? इंडिगोच्या विमानाने भरवली धडकी, जाणून घ्या किती सुरक्षित...
14
Vaishnavi Hagwane Case : 'वैष्णवीचे बाळ आणायला गेलो,आम्हाला बंदूक दाखवली'; मामांनी सगळंच सांगितलं
15
 काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघांना लष्कराने घेरले 
16
Apara Ekadashi 2025: अकाली मृत्युचे भय टळावे, म्हणून अपरा एकादशीला करा 'ही' उपासना!
17
हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला दिलासा नाही, पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ; बँक खात्याची चौकशी सुरूच
18
पाकिस्तानने स्वतः युद्धविरामाची चर्चा केली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला!
19
मानवतेचा महामेरु! पत्नी कॅन्सरने गेली, इतर रुग्णांची पैशांअभावी वणवण पाहता पतीची २० लाखांची देगणी
20
आधी वैभव सूर्यवंशीसोबत खोटा फोटो, आता प्रीती झिंटाची थेट कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

बारावी परीक्षेसाठी सहा भरारी पथकांची नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 06:23 IST

बारावी बोर्डाची परीक्षा एक दिवसावर येऊन ठेपली आहे. परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मुंबई विभागीय मंडळ सज्ज झाले आहे

प्राची सोनवणे नवी मुंबई : बारावी बोर्डाची परीक्षा एक दिवसावर येऊन ठेपली आहे. परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मुंबई विभागीय मंडळ सज्ज झाले आहे. मुंबई केंद्रावरील परीक्षा सुरक्षितरीत्या पार पडावी, तसेच परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडू नये याकरिता पहिल्यांदाच बोर्डाच्या वतीने सहा भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. दक्षता समितीसह जिल्हानिहाय प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी तसेच महसूल विभाग यांचे स्वतंत्र पथक असणार आहे. गेल्या वर्षी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणाºया प्रश्नपत्रिके मुळे यंदा विशेष खबरदारी घेत वर्गातच १० वाजून ५० मिनिटाला प्रश्नपत्रिकांचे पाकीट उघडण्यात येणार आहे.बुधवारी ११ ते २ या वेळेत इंग्रजीचा पहिला पेपर होणार आहे. प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. बारावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी केंद्र प्रमुख, अतिरिक्त केंद्र प्रमुख तसेच परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी सुट्टीच्या दिवशी देखील बोर्डाचे कामकाज सुरू असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या अधिकाºयांनी दिली. सोमवारी पोलीस संरक्षणासह १४ गाड्यांमधून ठाणे, पालघर, रायगड केंद्रावर परीक्षेचे गोपनीय साहित्य पोहोचविण्यात आले तर मंगळवारी उर्वरित १३ गाड्यांमधून मुंबई विभागातील सर्व केंद्रावर साहित्य सुरक्षितरीत्या पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती बोर्डाने दिली. यावेळी केंद्र संचालक तसेच परीरक्षकांना परीक्षा नियमांचे पालन, घ्यावयाची काळजी याविषयी सूचना करण्यात आल्या. परीक्षा केंद्रावर केंद्र संचालकांशिवाय कोणालाही मोबाइलचा वापर करता येणार नसून, मोबाइल जमा करावे लागतील. केंद्रापासून १०० मीटर अंतरावरील झेरॉक्स, टेलिफोन बुथ बंद राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करणार असल्याचेही बोर्डाने स्पष्ट केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षार्थींची संख्या कमी आहे आणि परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे.