शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कामगार कायद्यात भांडवलदार आणि मालक धार्जिणे बदल करण्यास सीटूचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 18:07 IST

नागपूर येथे विधान सभेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारही कामगार कायद्यात बदल करणार आहे. या बदलात कामगाराना संरक्षण देणाऱ्या तरतुदी हटवून त्या ऐवजी भांडवलदार व मालकांच्या फायद्याचे बदल प्रस्तावित आहेत.

मधुकर ठाकूर -

उरण : राज्य सरकार सोमवारी नागपूर अधिवेशनामध्ये कामगार कायद्यात भांडवलदार आणि मालक धार्जिणे बदल करणारे विधेयक मांडणार आहे. या सरकारच्या कामगार विरोधी धोरणांना सीआयटीयू कामगार संघटना राज्यभर विरोध करणार असल्याची घोषणा सिटूचे महाराष्ट्र सचिव ॲड.एम.एच.शेख यांनी उरण येथील जिल्हा अधिवेशनात केली. उरण येथील जेएनपीटी कामगार वसाहतीच्या सभागृहात आयोजित सीआयटीयुच्या रायगड जिल्हा अधिवेशनात ते बोलत होते.

नागपूर येथे विधान सभेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारही कामगार कायद्यात बदल करणार आहे. या बदलात कामगाराना संरक्षण देणाऱ्या तरतुदी हटवून त्या ऐवजी भांडवलदार व मालकांच्या फायद्याचे बदल प्रस्तावित आहेत. या बदलात कामगार कायद्यात मालक आणि भांडवलदारांसाठी असलेली शिक्षा आणि दंड  कमी करून दिखाऊ तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे कामगार कायदे कमजोर होणार आहेत. यात यापूर्वी असलेल्या कायद्यातील किमान शिक्षा आणि दंड कमी करून मालक आणि भांडवलदाराना रान मोकळं केलं जाणार आहे.

याचा परिणाम कामगारांचे भांडवलदार व मालकांच्या शोषणात होणार आहे. त्यामुळे या कायदा बदलांचा संपूर्ण राज्यात सीआयटीयुच्या वतीने विरोध करण्यात येणार आहे.  त्यासाठी राज्यात विविध जिल्ह्यात निदर्शने आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून निवेदने देऊन विरोध करण्यात येणार येणार असल्याची घोषणा सिटूचे महाराष्ट्र सचिव ॲड.एम.एच.शेख यांनी  जिल्हा अधिवेशनात केली.  

कामगार नेते मधुसूदन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या रायगड जिल्हा अधिवेशनात सीआयटीयुचे रायगड जिल्हा सरचिटणीस भूषण पाटील यांनी तीन वर्षांच्या कामाचा अहवाल मांडला. तर कामगार प्रतिनिधीनी चर्चा करून पुढील काळात कामगारांच्या प्रश्नांवर लढा व एकजूट करण्याचा निर्धारही करण्यात आला. या अधिवेशनात पुढील तीन वर्षांसाठी नवीन रायगड जिल्हा कमिटीचीही निवड करण्यात आली.याप्रसंगी महाराष्ट्राचे नेते कामगार नेते  डॉ.एस.के.रेगे,  के.आर.रघु,  किसान सभेचे संजय ठाकूर,जनवादी महिला संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्षा अमिता ठाकूर,डीवायएफआयचे सचिव राकेश म्हात्रे,शशी यादव,कल्पना घरत,विद्या पाटील, हिरामण पाटील आदी मान्यवरही उपस्थित होते. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारLabourकामगारWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन