शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

सायन-पनवेल महामार्ग जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 02:15 IST

सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सायन-पनवेल महामार्ग जलमय झाला होता.

पनवेल : सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सायन-पनवेल महामार्ग जलमय झाला होता. महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. विशेष म्हणजे पावसाच्या पाण्याचा निचरा करणारे कल्वर्ट अनेक ठिकाणी बंद असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मान्सूनपूर्व नियोजन न झाल्याने महामार्गावर पाणी साचल्याचा आरोप वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.सायन-पनवेल मार्गाच्या रुंदीकरणासाठी १२00 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरसुध्दा या महामार्गावर वाहनधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महामार्गावर कळंबोली, कामोठे दरम्यान सोमवारी तीनही लेन पाण्याखाली गेल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. पाण्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात अनेक वाहने रस्त्यावरच बंद पडल्याचे प्रकार घडले. तसेच महार्गावरील खारघर, हिरानंदानी, बेलपाडा, उरण फाटा या ठिकाणीही पाणी साचले होते. पहिल्याच पावसात महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अगोदरच वाहनधारकांची कसरत होत आहे. यातच मागील दोन दिवसांपासून पावसाने झोडपल्याने महामार्गाची चाळण झाली आहे. तुर्भे उड्डाणपुलाजवळ मोठा खड्डा पडला आहे. त्यात पावसाचे पाणी साचून त्याचे मोठ्या डबक्यात रूपांतर झाले आहे. वाहनधारकांना याचा अंदाज येत नसल्याने त्यात वाहने आपटून लहान-मोठे अपघात होत आहे. दरम्यान, सोमवारी तुर्भे उड्डाणपुलासह सानपाडा पुलावरही वाहतूककोंडीचा फटका बसला. मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने याठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.सायन-पनवेल महामार्गावरील बहुतांशी पथदिवे बंद आहेत. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. मागील दीड वर्षात या महामार्गावर जवळपास २५0 अपघात घडले असून, त्यात १00 पेक्षा अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यासंदर्भात ठोस उपाययोजना आखण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.रेल्वेस्थानकाच्या भुयारात पाणीसानपाडा रेल्वेस्थानकात देखील पाणी साचल्याने वाहतुकीच्या मार्गात अडथळा निर्माण झाला होता. प्रतिवर्षी या भुयारी मार्गात खड्डे पडून त्यात पाणी साचते. अशीच परिस्थिती ठाणे-बेलापूर मार्गावर महापे येथे नव्याने बांधलेल्या भुयारी मार्गात देखील निर्माण होत आहे. तर कोपरखैरणे, घणसोली रेल्वेस्थानकाचे पादचारी भुयारी मार्ग देखील पाण्याखाली गेल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती.महत्त्वाचे रस्ते पाण्याखालीवाशी-कोपरखैरणे मार्गावर वाशी सेक्टर ९, तुर्भे, मॅफ्को मार्केट, सानपाडा यासह अनेक सखल भागातील मार्गावर एक ते दोन फुटापर्यंत पाणी साचले होते. रस्त्यालगतच्या नाल्यातून पाण्याचा निचरा न झाल्याने ते रस्त्यावरून वाहत होते. यामुळे बहुतांश ठिकाणी वाहतूक ठप्प होवून वाहने बंद पडण्याचे प्रकार घडत होते. काही ठिकाणी सफाई कामगारांनी धाव घेवून तुंबलेली गटारे मोकळी करून पाण्याचा मार्ग मोकळा केला, तर दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सर्वच ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आली.खांदा वसाहतीत स्थानिक नगरसेवकांनी यंदा नालेसफाईकरिता पाठपुरावा केला. त्यामुळे नाल्यातील गाळ काढून पावसाच्या पाण्याला मार्ग करून देण्यात आला. तसेच ज्या ठिकाणी पाणी साचत होते तिथे गटारांची कामे करण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी गेले दोन दिवस पाणी साचले नाही. सिडकोने चांगले काम केले असल्याची प्रतिक्रि या नगरसेवक संजय भोपी यांनी ‘लोकमत’ला दिली.