शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सायन - पनवेल महामार्ग पालिकेकडे हस्तांतरित होणार, १४ किलोमीटरची देखभाल-दुरुस्ती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:55 IST

नवी मुंबई : वाशी ते बेलापूरपर्यंतचा सायन-पनवेल महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे.

नवी मुंबई : वाशी ते बेलापूरपर्यंतचा सायन-पनवेल महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. हस्तांतरित झाल्यानंतर १४ किलोमीटर लांबीच्या महामार्गावरील देखभाल-दुरुस्तीचे काम पालिका करणार आहे.राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या सायन - पनवेल महामार्गाची योग्य देखभाल केली जात नाही. पावसाळ्यात सदर महामार्गाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असतात. महामार्गामुळे उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल झाली असून, त्यामध्येही मनपाचा उल्ले आहे. खड्डे व डेब्रिज व बंद असलेल्या पथदिव्यांमुळे आपघात होत असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याशिवाय वारंवार वाहतूककोंडी होऊन १४ किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास वेळ लागत आहे. फिफा सामन्यांदरम्यान महामार्गावरील अत्यावश्यक कामे पालिकेने केली आहेत. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, महामार्ग हस्तांतरित करून घेण्याची मागणी होऊ लागली होती.महामार्गाची योग्य देखभाल करता यावी व नागरिकांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी महामार्ग हस्तांतरित करून घेण्याचा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आला होता.सर्वसाधारण सभेने या प्रस्तावास मंजुरी दिली असून, तो पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.