शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत झोपड्यांनी व्यापले पदपथ, कोपरखैरणेतला प्रकार, परिसराला आली अवकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 01:14 IST

Navi Mumbai News : नवी मुंबईत अनधिकृत झोपड्यांचे पेव वाढतच चालले आहे. त्यात भिकाऱ्यांच्या वस्त्यांचे सर्वाधिक प्रमाण आहे. मोक्याच्या ठिकाणी त्यांच्याकडून वस्त्या उभारल्या जात असल्याने, यामागे कटकारस्थान असल्याचीही शक्यता आहे.

 नवी मुंबई : कोपरखैरणे रेल्वे स्थानकालगतच अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यांच्याकडून पदपथ व्यापण्यात आले आहेत. यामुळे परिसराला अवकळा आली आहे.नवी मुंबईत अनधिकृत झोपड्यांचे पेव वाढतच चालले आहे. त्यात भिकाऱ्यांच्या वस्त्यांचे सर्वाधिक प्रमाण आहे. मोक्याच्या ठिकाणी त्यांच्याकडून वस्त्या उभारल्या जात असल्याने, यामागे कटकारस्थान असल्याचीही शक्यता आहे. असाच प्रकार कोपरखैरणे येथे रेल्वे स्थानकालगत पाहायला मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी त्या ठिकाणी अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरू असताना झालेल्या विरोधामध्ये पोलीस अधिकारी जखमी झाले होते. त्यानंतर बळाचा वापर करून भूखंड मोकळा करण्यात आला. मात्र, भूखंडावरून हटवलेल्या झोपड्या पदपथावर उभारण्यात आल्या आहेत. दोन वर्षांत त्यांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला आहे.या मार्गाने ये-जा करणाऱ्यांची अडवणूक करून भीक मागणे, मद्यपान करून रस्त्यावर हाणामारी करणे असे प्रकार रात्रंदिवस त्या ठिकाणी सुरू असतात. यामुळे संपूर्ण परिसराला अवकळा आली आहे, तर झोपड्यांमध्ये राहणाऱ्यांकडून संपूर्ण परिसरात कचराही पसरवला जात आहे. यामुळे स्वच्छता अभियानाचाही बोजवारा उडत आहे. त्या ठिकाणी कारवाई करण्यासंदर्भात अनेकांकडून प्रशासन दरबारी तक्रार करण्यात आलेली आहे. यानंतरही दोन वर्षांत तिथली झोपडपट्टी हटवणे प्रशासनाला अवघड जात असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. 

मोक्याची जागा घेतलीज्या ठिकाणी या झोपड्या थाटण्यात आल्या आहेत, ती मोक्याची जागा आहे. यामुळे अर्थपूर्ण उद्देशाने परिसराला गलिच्छ दर्शविण्याच्या उद्देशाने झोपड्यांना अभय दिले जात असल्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई