शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सीआरझेड परवानगीचे पुरावे दाखवा; आक्सा बीच भिंतीबाबत राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 07:46 IST

अर्जकर्त्यांचे वकील रोनिता भट्टाचार्य यांनी हे नमूद केले की, महाराष्ट्र किनारपट्टी नियामक प्राधिकरणाच्या मिनिट्समध्ये सीआरझेड १ क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या बांधकामावर स्पष्टपणे निर्बंध घातले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) महाराष्ट्र सागरी महामंडळाला (एमएमबी) आक्सा बीचवर समुद्री भिंत बांधकामाच्या संदर्भातली सीआरझेड परवानगीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. नवी मुंबईतील नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार आणि मुंबई स्थित पर्यावरण कार्यकर्ता झोरू बाथेना यांनी दाखल केलेल्या अर्जावर लवादाच्या पुणे येथील पश्चिम पीठाने आक्षेपांची दखल घेतली आहे. अर्जकर्त्यांनी बीचच्या मधोमध बांधलेली भिंत सीआरझेड नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा आहे.

अर्जकर्त्यांचे वकील रोनिता भट्टाचार्य यांनी हे नमूद केले की, महाराष्ट्र किनारपट्टी नियामक प्राधिकरणाच्या मिनिट्समध्ये सीआरझेड १ क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या बांधकामावर स्पष्टपणे निर्बंध घातले आहेत. यासंदर्भात प्रयत्न करूनदेखील आणि आरटीआय निवेदने देऊनही राज्य पर्यावरण विभागाकडून सीआरझेड मंजुरीचे दस्तऐवज त्यांना मिळाले नाहीत.

नॅटकनेक्टने केलेल्या तक्रारीवरून केंद्रीय पर्यावरण, वन  मंत्रालयाने राज्य पर्यावरण विभागाला प्रकरणात लक्ष घालण्याचे  निर्देश दिले होते. मात्र,प्रतिसाद मिळाला नाही.दरम्यान, न्या. दिनेश कुमार सिंग यांचा न्यायिक सदस्य व  डॉ. विजय कुलकर्णी यांचा तज्ज्ञ सदस्य म्हणून समावेश असलेल्या पीठाने एमएमबीचे वकील साकेत मोने यांना कागदपत्र सादर करण्याचे निर्देश दिले. 

पुरावे ग्राह्य धरत निर्णय राष्ट्रीय हरित लवादाच्या विशेष पीठाचे अध्यक्ष न्या. आदर्श कुमार गोयल यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधल्या बीचेसवर समुद्री भिंतींसाठी निर्बंध लागू केले होते.  न्यायाधिश गोयल यांच्या विशेष पीठाने सविस्तर किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचा राज्यांना आदेश दिला होता.