शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यावर नसल्याने ८ डॉक्टरांना पालिकेची कारणे दाखवा नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 02:32 IST

Navi Mumbai News : नवी मुंबई पालिकेने वाशीतील डेडिकेटेड काेविड हॉस्पिटलचे पुन्हा जनरल रुग्णालयात रूपांतर केले आहे. प्रथम संदर्भ रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या सूचना आयुक्तांनी यापूर्वीच प्रशासनास दिल्या.

नवी मुंबई : मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंगळवारी वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाला अचानक भेट दिली. पाहणीच्या वेळी ८ ऑनकॉल वैद्यकीय अधिकारी हजेरीपत्रकावर अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. त्या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नवी मुंबई पालिकेने वाशीतील डेडिकेटेड काेविड हॉस्पिटलचे पुन्हा जनरल रुग्णालयात रूपांतर केले आहे. प्रथम संदर्भ रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या सूचना आयुक्तांनी यापूर्वीच प्रशासनास दिल्या. रुग्णालयातील कामकाज कसे सुरू आहे, याची माहिती घेण्यासाठी आयुक्तांनी अचानक भेट दिली. रुग्णालयाच्या पाहणीच्या वेळी हजेरीपत्रक तपासले असता, ऑनकॉल मेडिकल ऑफिसर हजेरीपत्रकावर अनुपस्थित असल्याचे आढळून आले. याची गंभीर दखल घेऊन ८ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याविषयी खुलासा घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे. हजेरी पत्रकात त्यांच्या यापूर्वीच्या काळातील उपस्थितीच्या स्वाक्षरी नसल्याचे आढळल्याने चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रुग्णालयातील शौचालयाची स्वच्छता व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास आल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. येथील स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या.वाशी रुग्णालयात कोरोना सुरू होण्यापूर्वीपेक्षा आता ओपीडीमधील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. रुग्णालय पुन्हा सुरू झाल्याची माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहनही करण्यात आले. नागरी आरोग्य केंद्रांनाही याविषयी सूचना देण्यात याव्यात, रुग्णालयातील शस्रक्रियांची संख्याही वाढविण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले.  मनपाचे वाशी येथील रुग्णालय सर्वात मोठे असून, नागरिकांना वैद्यकीय आधार देणारे आहे. त्यामुळे तेथे अधिक चांगल्या सुविधा देता येतील, याकडे बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यापुढेही रुग्णालयांचा अचानक पाहणी दाैरा करण्यात येणार आहे.-अभिजीत बांगर, आयुक्त, महानरपालिका 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईdocterडॉक्टर