शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांनी दिवाळीची खरेदी आताच करायची काय?, डाळी महाग; पुढील काही महिन्यांत आणखी भाववाढीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 12:31 IST

जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

नवी मुंबई : डाळी, कडधान्य हा सर्वसामान्य नागरिकांचा रोजचा आधार. भाजीपाला रोज खरेदी करणे शक्य होत नसल्यामुळे डाळी, कडधान्यावरच अनेकांना जीवन जगावे लागते. पण आता यांच्या किमतीही प्रचंड वाढत आहेत. पुढील काही महिन्यात यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे दिवाळीची खरेदी आताच करायची काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. रोज भाजीपाला खरेदी करणे सामान्य नागरिकांना परवडत नाही. एवढा पैसाही त्यांच्याजवळ नसतो. यामुळे डाळी, कडधान्याला सर्वाधिक पसंती दिली जाते. परंतु मागील काही महिन्यांपासून या वस्तूंचे दर वाढत आहेत. होलसेल मार्केटमध्ये तूरडाळ ९५ ते १४५ रुपये किलो झाली आहे. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर १५० ते १८० रुपयांवर पोहोचले आहेत. होलसेल मार्केटमध्ये उडीदडाळ ८० ते १२५ व मूगडाळ ८० ते १२८ रुपये किलो झाली आहे. डाळीही प्रतिकिलो दोनशेच्या घरात जाऊ लागल्यामुळे आता खायचे काय असा प्रश्नही काम करणाऱ्यांना पडला आहे. 

...म्हणून वाढले दरदेशात कडधान्याचे उत्पादन कमी झाले आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक होत नसल्यामुळे दर वाढू लागले आहेत. कडधान्याची आयातही पुरेशा प्रमाणात होत नसून या सर्वांमुळे दर वाढले आहेत. 

कमी पावसामुळे वाढणार दर यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला. एक महिना सलग कोसळल्यानंतर पुन्हा गायब झाला आहे. यामुळे योग्य प्रमाणात पेरण्या झालेल्या नाहीत. पुरेसे उत्पादन होण्याची शक्यता नसल्यामुळे यापुढे दर अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई