नवी मुंबई : काजूकतली खरेदीसाठी आलेल्या दोघांनी दुकानात काजूकतली नसल्याच्या कारणावरून तोडफोड केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, एकाने पळ काढला आहे. त्यांच्याकडून व्यावसायिकाला मारहाण होत असताना मदतीला आलेल्या इतर व्यावसायिकांनाही त्यांनी मारहाण केली.घणसोली सेक्टर ४ येथे रविवारी १०.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. तेथील मधुवन या मिठाईच्या दुकानात दोन तरुण काजूकतरी खरेदीसाठी आले. या वेळी त्यांचा एक साथीदार दुकानापासून काही अंतरावर उभा होता. त्यांनी दुकानदाराकडे काजूकतली मागितली असता, ती संपल्याचे दुकानदाराने सांगितले. याचा राग आल्याने दोघांनी काजूकतली नाही तर पैसे दे, असे म्हणत त्याच्यासोबत झटापट केली.व्यावसायिकाने मदतीसाठी आरडाओरडा केला असता, त्याच्या कुटुंबातील, तसेच परिसरातील इतर व्यावसायिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. या वेळी त्या तिघांनी जमलेल्या इतरांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली असता, सर्वांनी त्यांना पकडून पोलिसांना या घटनेची माहिती दिली.मात्र या वेळी संधी साधून तिघांपैकी एकाने पळ काढला असता, उर्वरित दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्याविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
काजूकतली न दिल्याने दुकानाची तोडफोड, घणसोलीतला प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:42 IST