शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांनी घेतला कारवाईचा धसका

By admin | Updated: June 16, 2016 01:22 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. तसेच मार्जिनल स्पेस बळकावणाऱ्या व्यापाऱ्यांनाही तंबी दिली आहे. याचा चांगलाच धसका व्यापाऱ्यांनी

नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. तसेच मार्जिनल स्पेस बळकावणाऱ्या व्यापाऱ्यांनाही तंबी दिली आहे. याचा चांगलाच धसका व्यापाऱ्यांनी घेतला असून, अनेकांनी स्वत:हून मार्जिनल स्पेसच्या जागा मोकळ्या करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे.शहरातील बहुतांशी व्यापाऱ्यांनी मार्जिनल स्पेसच्या जागा बळकाल्या आहेत, तर फेरीवाल्यांनी पदपथांवर बस्तान मांडले आहे. त्यामुळे रहिवाशांची मोठी अडचण होत आहे. यासंदर्भात वाढत्या तक्रारींची दखल घेत आयुक्त मुंढे यांनी मागील काही दिवसांपासून फेरीवाल्यांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे बहुतांशी पदपथ मोकळे झाल्याचे दिसून येते. फेरीवाल्यांबरोबरच मार्जिनल स्पेसवरील अतिक्रमणांवरही आयुक्तांनी आपली नजर रोखली आहे. संबंधित व्यापारी व हॉटल्सचालकांना ठरावीक मुदतीत मार्जिनल स्पेसवरील ताबा काढून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. एरव्ही महापालिकेच्या कारवाईला भीक न घालणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता स्वत:हून मार्जिनल स्पेसवरील अतिक्रमण तोडायला घेतले आहे. वाशी सेक्टर १७ येथील बिग स्प्लॅस इमारतीतील बहुतांशी व्यापाऱ्यांनी दुकानासमोर वाढविलेले चौथरे स्वत:हून तोडण्याचे काम हाती घेतले आहे. (प्रतिनिधी)