शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

शिवसमर्थ स्मारक लोकार्पण सोहळा, शिवराय अन् समर्थ रामदास भेटीचा पुतळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 03:18 IST

उरण-दास्तान येथील शिवसमर्थ स्मारकाचे उद्घाटन पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते बटण दाबून करण्यात आले.

उरण-दास्तान येथील शिवसमर्थ स्मारकाचे उद्घाटन पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते बटण दाबून करण्यात आले. यावेळी अलोट जनसमुदाय उपस्थित होता. जेएनपीटीने तब्बल ३० कोटी खर्चून शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीवर आधारित या शिवसमर्थ स्मारकाची उभारणी केली आहे. भक्ती, शक्ती आणि श्रद्धेचा अनोखा मेळ या स्मारकात दिसून येत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी, अर्थराज्यमंत्री पी. राधाकृष्णन, रायगड पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खा. श्रीरंग बारणे, माजी खा. रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, आ. मनोहर भोईर, आ. निरंजन डावखरे, भरत गोगावले, आ. बाळाराम पाटील, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष अदिती तटकरे, जेएनपीटी अध्यक्ष संजीव सेठी, जेएनपीटी ट्रस्टी महेश बालदी, उरण नगराध्यक्षा सायली म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.मन, मानव आणि मानवता याची शिकवण आमच्या प्रतिष्ठानतर्फे देऊन समाज सुधारण्याचे काम केले जात आहे. सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही भूमिका आपल्याकडे असतील, तरच आपल्या चुकांची उकल होते.- सचिनदादा धर्माधिकारीउरणमध्ये प्रथमच एवढ्या भव्य कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल पाच लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. अनेक दासभक्त शनिवारपासूनच कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते.२सोहळ्यासाठी पार्र्किं ग व्यवस्था, उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी पोलिसांसह दासभक्तांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शिस्तबद्ध पद्धतीने अनुयायी नमस्कार, आदरभाव स्वीकारत मार्गस्थ होत होते. कार्यक्र म सोहळ्याच्या ठिकाणी गायक नंदेश उमप, वैशाली सामंत यांनी गीते सादर केली.दासभक्तांची लाखोंच्या संख्येत उपस्थिती

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNavi Mumbaiनवी मुंबई