शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे सुशोभीकरण व्हावे, पनवेल महापालिका आयुक्तांना दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 02:28 IST

पनवेल शहर महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका आहे. विशेष म्हणजे, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची विशेष ओळख आहे.

पनवेल : पनवेल शहर महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका आहे. विशेष म्हणजे, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची विशेष ओळख आहे. या रायगडाचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी लक्षवेधीद्वारे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केली आहे. मात्र, ही लक्षवेधी महासभेत विचारात घेतली नसल्याने म्हात्रे यांनी आयुक्त डॉ. शिंदे यांना सोमवारी पत्र देऊन यासंदर्भात गांभीर्याने विचार करण्याची मागणी केली आहे.पनवेल शहरात महाराजांचा अश्वारूढ पुतळा सध्याच्या घडीला दिमाखात उभा आहे. शहरातील वाहतूक शाखेच्या चौकीलगत शिवाजी चौकात हा अश्वारूढ पुतळा १९८६-८७ साली उभारण्यात आला आहे. मात्र, संबंधित ठिकाणाबाबत कोणतेही सूचना फलक या परिसरात लावण्यात आलेले नाहीत. पनवेल शहर हे ऐतिहासिक शहर आहे. यासंदर्भात ठिकठिकाणी तशा प्रकारच्या नोंदी सापडतात. मात्र, अशा वेळी राज्याचे वैभव असलेल्या महाराजांच्या स्मारकाबाबत प्रशासनाची उदासीनता आजवर दिसून आली आहे. या ठिकाणी अद्याप सीसीटीव्ही बसविण्यात आले नाहीत. स्मारकाची योग्य पद्धतीने देखरेख केली नसल्याने या परिसरात घुशी आणि उंदरांचा वावर वाढत चालला आहे. या उद्यानातील फांद्यांची छाटणीही वेळेवर केली जात नसल्याने कोणत्याही क्षणी या ठिकाणची झाडे उन्मळून महाराजांच्या पुतळ्यावरही पडू शकतात. या गंभीर विषयाबाबत नुकत्याच पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत लक्षवेधी मांडून देखील ती विचारात न घेतल्यामुळे प्रशासनाला महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासंदर्भात गांभीर्य नसल्यामुळेच ही महत्त्वाची लक्षवेधी विचारात घेतली नसल्याचा आरोप म्हात्रे यांनी या वेळी केला.आयुक्तांची भेट घेऊन पुतळ्याच्या सुशोभीकरणासंदर्भात नवीन प्रस्ताव सादर करण्यात आला. सुशोभीकरणासंदर्भात नवीन कलाकृती (डिझाइन) सादर करण्यात आली. या वेळी छत्रपतींचा जीवनपट उलगडणारे चित्र, विद्युत रोषणाई, रायगड जिल्ह्याची प्रतिकृती साकारणारी पाहिजे, आबालवृद्धांसाठी वाचनालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय या ठिकाणी उभारावे, अशा प्रकारचा प्रस्ताव आयुक्तांसमोर सादर केला. टपालनाका परिसरातील महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचेही सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.