शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

शिवसेनेने सिडकोला दिला आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 02:41 IST

गरजेपोटी घरे नियमित होण्यात खोडा घालणारे पत्र सिडकोकडून पालिकेला प्राप्त झाले आहे.

नवी मुंबई : गरजेपोटी घरे नियमित होण्यात खोडा घालणारे पत्र सिडकोकडून पालिकेला प्राप्त झाले आहे. या पत्रामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, त्यांची गावठाणालगतची घरे नियमित करण्याच्या मार्गात अडथळा आला आहे. त्यामुळे सिडकोने सदरचे पत्र मागे घ्यावे, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा शिवसेनेच्या वतीने सिडकोला देण्यात आला आहे.सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी बढती मिळाल्यानंतर सिडकोचा पदभार सोडण्यापूर्वी पालिकेला पत्र दिले आहे. त्यामध्ये गावठाणालगतच्या जमिनी सिडकोने संपादित केलेल्या असून, त्याचा मोबदला संबंधित भूधारकांना दिलेला आहे. यामुळे सिडको मालकीच्या जमिनींवरील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यास सिडको एनओसी देणार नसल्याचाही उल्लेख त्या पत्रात केलेला आहे. या पत्रावरून प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. एकीकडे शासन गरजेपोटी घरे नियमित करण्यास सकारात्मक असतानाच, सिडको अशा प्रकारचे पत्र देऊन महत्त्वपूर्ण निर्णयात खो घालत असल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी केला आहे.सिडकोने नवी मुंबईत बांधलेली रेल्वेस्थानके इतर शहरातील स्थानकांसाठी मार्गदर्शक आहेत. मात्र, सध्या सिडको आणि रेल्वे प्रशासनाच्या वादात या स्थानकांची दयनीय अवस्था झाली आहे. या स्थानकांमधील सुविधांमध्ये सुधार करून प्रवाशांच्या गैरसोयी दूर करण्याचीही मागणी खासदार विचारे यांनी केली. या मागण्यांसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची भेट घेतली. या वेळी खासदार राजन विचारे यांच्यासह उपनेते विजय नाहटा, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, विठ्ठल मोरे, रंजना शिंत्रे, मनोहर मढवी, द्वारकानाथ भोईर आदी उपस्थित होते. या शिष्टमंडळाने त्यांच्या मागणीचे निवेदन चंद्र यांना दिले.शासनाने २०१५ पूर्वीची घरे नियमित करण्यासाठी २०१७मध्ये नोटिफिकेशन काढून गरजेपोटीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याला सकारात्मकता दर्शवली होती. त्यानंतर एमआरटीपी कायद्यात आवश्यकतेनुसार झालेल्या बदलानंतर पालिकेने घरे नियमित करण्यासाठी अर्ज मागवले होते. ही प्रक्रिया सुरू असतानाच सिडकोने गावठाणालगतच्या एकाही अनधिकृत घराला एनओसी देणार नसल्याची भूमिका पत्राद्वारे स्पष्ट केली आहे. सिडकोने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.