शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

शांताबाई जाधव यांचे रेल्वे अपघातात निधन

By admin | Updated: May 30, 2017 06:16 IST

सर्वहारा जनआंदोलनाच्या आधारवड, उपेक्षित, आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी आयुष्य समर्पित केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या

लोकमत न्यूज नेटवर्करोहा : सर्वहारा जनआंदोलनाच्या आधारवड, उपेक्षित, आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी आयुष्य समर्पित केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई जाधव (६२) यांचे शनिवारी सायंकाळी अष्टमी रोहा रेल्वे स्थानकाजवळील पटरीवर मांडवी एक्स्प्रेस रेल्वेच्या धडकेने जागीच निधन झाले. त्यांच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच रोह्यासह रायगड जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली. सामाजिक कार्यकर्त्या जाधव यांच्या आकस्मिक जाण्याने विविध सेवाभावी संघटनांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. समाजसेविका उल्का महाजन यांनी कार्यकर्त्या शांताबाई जाधव यांच्या रेल्वे अपघाती निधनाबद्दल शोक व्यक्त केला. शनिवारी सायंकाळी मडगाव रोहाकडून मुंबईकडे जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेस रेल्वेने शांताबाई जाधव यांना धडक दिली. त्या पटरी ओलांडून पिंगळसई गावाकडे जात होत्या. अचानक आलेली मांडवी एक्स्प्रेस जाधव यांच्या लक्षात आली नाही. त्या रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्युमुखी पडल्या, अशी माहिती रोहा पोलीस प्रशासनाने दिली. शांताबाई जाधव यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्वहारा आंदोलनाचे अध्यक्ष सोपान सुतार, चंद्रकांत गायकवाड, नथुराम वाघमारे, पांडुरंग वाघमारे, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.शांताबाई जाधव यांचा मृतदेह रोहा ग्रामीण रुग्णालयात आणला, मात्र रुग्णालयात शवविच्छेदनासाठी प्रमुख डॉक्टर हजर नव्हते, याबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त झाला. तद्नंतर मृतदेह आंबेवाडी रुग्णालयात नेणार तोच त्याही रुग्णालयात डॉक्टर नसल्याचे समजताच अखेर त्यांचा मृतदेह माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. तिथेही शासकीय अनास्थेच्या कागदोपत्रांशी सामना करावा लागला. मृतदेह शासकीय प्रक्रियेसाठी अलिबाग, मुंबईला हलवावा असे सांगण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ससाणे रात्री अलिबाग बैठकीला गेले होते. अशा वेळी इतर सर्व अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा समोर आला. याबाबत सर्वहाराचे अध्यक्ष सोपान सुतार यांनी संताप व्यक्त केला.