शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
ओलाचा बैल केला, शेतीला जुंपला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले...
3
ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड
4
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
5
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
6
'सैयारा'चा अहान पांडे चेन स्मोकर होता? युट्यूबरने केली पोलखोल; म्हणाला, "वर्कशॉपवेळी तर..."
7
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
8
'मुरांबा'मध्ये एन्ट्री केलेल्या 'या' चिमुकलीने हिंदीतही केलंय काम, ओळखलंत का?
9
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
10
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
11
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
12
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
13
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
14
पोलिस मारहाण प्रकरणातून गोपाळ शेट्टी यांची मुक्तता; ठोस, विश्वासार्ह पुराव्यांचा अभाव : न्यायालय
15
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
16
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
17
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
18
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
19
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
20
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत परप्रांतीय मच्छीमारांचा धुमाकूळ

By admin | Updated: March 16, 2017 03:03 IST

परप्रांतीय मच्छीमार बोटींनी महाराष्ट्र राज्याच्या १२ नॉटिकल सागरी हद्दीत घुसून धुमाकूळ घातला आहे. राज्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून राज्यातील

उरण : परप्रांतीय मच्छीमार बोटींनी महाराष्ट्र राज्याच्या १२ नॉटिकल सागरी हद्दीत घुसून धुमाकूळ घातला आहे. राज्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून राज्यातील मच्छीमारांच्या वाट्याला लाखो टन मासळीची लूट करीत आहे. महाराष्ट्र सरकारकडून कारवाई होत नसल्याने मच्छीमारांमध्ये तीव्र असंतोष आहे.महाराष्ट्र राज्याच्या १२ नॉटिकल सागरी हद्दीत परप्रांतीय मच्छीमारांना मासेमारी करण्यास बंदी आहे. मात्र राज्याचा बंदी कायदा झुगारून आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गुजरात आदि परराज्यातील सुमारे १५०० मच्छीमार बोटी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे घुसखोरी करीत आहेत. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश मच्छीमार बोटी २०० हॉर्सपॉवर क्षमतेच्या आहेत. मात्र परप्रांतातून येणाऱ्या मच्छीमार बोटी २०० ते ४२७ हॉर्सपॉवरपर्यंतच्या क्षमतेच्या असतात. अशा मोठ्या हॉर्सपॉवर क्षमतेच्या बोटी अक्षरश: महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत धुडगूस घालतात आणि छोटी मोठी मासळी पकडतात. महाराष्ट्र राज्यातील मच्छीमारांच्या वाट्याला लाखो टन मासळीची लूट करतात. आधीच राज्यातील मच्छीमार व्यवसाय समुद्रात सातत्याने जाणवणाऱ्या मासळीचा दुष्काळ आणि भेडसाविणाऱ्या इतर समस्यांमुळे पुरता कोलमडला आहे. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत परप्रांतीय मच्छीमारांच्या बेकायदेशीर घुसखोरीमुळे मात्र राज्यातील मच्छीमारांच्या वाट्याला येणाऱ्या मासळीचे प्रमाण कमी झाले आहे. प्रचंड हॉर्सपॉवर क्षमतेच्या मच्छीमार बोटी राज्यातील हद्दीतील मासळी पळवून नेत आहेत. परप्रांतीय मच्छीमार बोटींची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. अनेक परप्रांतीय मच्छीमार बोटी पकडलेली मासळीही मुंबईच्या ससून डॉक आणि कसारा बंदर (भाऊचा धक्का) येथे उतरून विक्रीही करतात. अनेक परप्रांतीय बोटी मासळीची विक्रीही मुंबई येथेच करीत असल्याने मासळीची आवक वाढते. परिणामी आवक वाढल्याने मासळीचे भाव घसरतात. एकाच परवान्यावर अनेक परप्रांतीय मच्छीमार बोटी मासळीचा व्यवसाय करीत आहेत. परप्रांतीय मच्छीमारांना शासकीय अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास शासकीय यंत्रणाही धजावत नसल्याचा आरोप मच्छीमारांकडून केला जात आहे. परप्रांतीय मच्छीमारांची महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे अतिक्रमण झाल्याची कबुली मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. या विभागाकडून काही परप्रांतीय मच्छीमार बोटींवर कारवाई केल्याची माहितीही संबंधित कार्यालयातून देण्यात आली आहे.