शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल येथील स्थलांतरित कृषी उत्पन्न बाजार समिती कोरोनाच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 00:53 IST

सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा : प्रशासनाचे नियम पायदळी

लाेकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने महापालिका व कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडून खांदा वसाहतीतील सर्कस मैदानावर मार्केट स्थलांतरित करण्यात आले आहे. तरीदेखील या मार्केटमध्ये दररोज मोठी गर्दी उसळत असल्याने कोरोनाला आमंत्रण दिल्यासारखे आहे. प्रशासनाकडून कोरोना नियमानुसार उपाययोजना करण्यात आल्या आहेत . पण हा नियम पाळायचा असतो हे मात्र मार्केटमध्ये येणारे विसरल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी, व्यापारी, ग्राहक असे दररोज सकाळी तीन हजारांपेक्षा जास्त नागरिकांची वर्दळ होत होती. शासनाकडून सार्वजनिक ठिकाणी होत असलेली गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पण नागरिकांकडून शासनाने दिलेल्या सूचनेची पायमल्ली केली जात आहे. गर्दी कमी होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर १९ एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्यात आली. हे मार्केट २६ एप्रिलपासून खांदा वसाहतीतील सर्कस मैदानावर सोशल डिस्टन्सनुसार सुरु करण्यात आले. याकरिता सर्कस मैदानावर २०० स्टाॅलची व्यवस्था करण्यात आली आहे.तर मार्केटसाठी जागा, लाईट, पाणी व्यवस्था पालिकेकडून करण्यात आली आहे.

स्पीकरवरून दिलेल्या घोषणेचाही उपयोग नाहीमंगळवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. कोरोना बाबतचे सर्व नियम स्पीकरवरून वारंवार सांगण्यात येत होते. तरीही त्याकडे लक्ष न देता लोकांची गर्दी होत होती. नियम पाळण्यासाठी शेतकरी, व्यापारी, ग्राहक यांना सांगितले जाते. तसेच नियम पाळले न गेल्यास कारवाई देखील करण्यात येत असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबई