शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय नेत्यांची छायाचित्रे संकेतस्थळांवरून तत्काळ काढा, निवडणूक आयोगाच्या आदेशाला अनेक महामंडळांकडून हरताळ

By नारायण जाधव | Updated: March 8, 2024 12:14 IST

यामुळे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व प्रशासकीय विभाग आणि महामंडळांनी त्यांच्या संकेतस्थळांवर असलेली राजकीय नेत्यांची छायाचित्रे तत्काळ काढावीत, याची पुन्हा एकदा ५ मार्च २०२४ रोजी आठवण करून दिली आहे.

नवी मुंबई : येत्या आठवडाभरात कधीही लाेकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर २ जानेवारी २०२४ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांतील संबंधित मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या संकेतस्थळांवरून राज्यकर्त्यांची  छायाचित्रे तत्काळ काढून आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अनेक महामंडळे आणि विभागांनी त्याचे  पालन न करता नेत्यांची छायाचित्रे तशीच ठेवली आहेत. 

यामुळे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व प्रशासकीय विभाग आणि महामंडळांनी त्यांच्या संकेतस्थळांवर असलेली राजकीय नेत्यांची छायाचित्रे तत्काळ काढावीत, याची पुन्हा एकदा ५ मार्च २०२४ रोजी आठवण करून दिली आहे. राज्यातील महाराष्ट्र शासनाच्या मुख्य संकेतस्थळासह ‘एमएमआरडीए’, ‘सिडको’सह अन्य महामंडळांच्या संकेतस्थळांवर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि खात्याच्या मंत्र्यांची छायाचित्रे निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतरही झळकत असल्याचे दिसत आहे.

उपजिल्हाधिकाऱ्यांना निर्देशराज्यातील सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक काळात आणि निवडणूक झाल्यानंतर आचारसंहिता भंगाच्या ज्या तक्रारी येतील,  त्यांचे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तत्काळ निराकरण करावे. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांनी आलेल्या तक्रारींचे निवारण  आयोगाच्या निर्देशानुसार केले आहे की नाही, याची खातरजमा करावी, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने  दिले आहेत.

धोरणात्मक निर्णयाप्रकरणी मार्गदर्शन घ्याएखाद्या विशिष्ट धोरणात्मक निर्णयाप्रकरणी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन किंवा मान्यतेची आवश्यकता असल्यास, फक्त अशीच प्रकरणे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फतच नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या छाननीनंतरच पाठवावीत, असेही आदेश  देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPoliticsराजकारण