शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गृहकर्जाचे ४० लाख हडपून बापलेकाची केली फसवणूक, सात जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 06:52 IST

जुईनगर परिसरात राहणाऱ्या कुटुंबासोबत हा प्रकार घडला. त्यांना पैशांची गरज असल्याने ते गृहकर्ज मिळवण्याच्या प्रयत्नात होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पैशांची गरज असलेल्या बापलेकाला गृहकर्ज मंजूर करून देऊन त्यावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सात जणांवर नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे अगोदरच कर्जात असलेल्या बापलेकावर नवे आर्थिक संकट कोसळले आहे.

जुईनगर परिसरात राहणाऱ्या कुटुंबासोबत हा प्रकार घडला. त्यांना पैशांची गरज असल्याने ते गृहकर्ज मिळवण्याच्या प्रयत्नात होते. परंतु, बँकेकडून त्यांना कर्ज मिळत नसल्याने ते इतर वित्तसंस्थांकडून कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्यांना घरावर कर्ज मिळवून देण्याची हमी दिली. 

त्यांच्यावर विश्वास ठेवून बापलेकाने कर्जासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करून संबंधितांना स्वाक्षरी केलेली कागदपत्रे व धनादेश दिले होते. यानंतर काही दिवसातच त्यांना गृहकर्ज मंजूर झाले असून, त्याची रक्कम खात्यात जमा होताच धनादेशाद्वारे काढून घेतल्याचे निदर्शनात आले. 

चौकशी करूनही प्रतिसाद नाहीयाबाबत त्यांनी चौकशी केली असता कर्ज मिळवून देणाऱ्यांनी त्यांच्याकडील धनादेशाचे वापर करून ४० लाख रुपये स्वतःच्या वेगवगळ्या खात्यात जमा करून घेतले होते. याबाबत त्यांनी संबंधितांकडे चौकशी करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून नेरूळ पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी अशाप्रकारे इतर कोणाची फसवणूक केली आहे का? याचीही अधिक चौकशी पोलिस करत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजी