शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रबळगडसह गाढेश्वर, मोरबे धरण परिसरावर बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 02:36 IST

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून तालुक्यातील गाढेश्वर धरण, मोरबे धरण, माची प्रबळ गडाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

- मयूर तांबडे पनवेल : पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून तालुक्यातील गाढेश्वर धरण, मोरबे धरण, माची प्रबळ गडाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गाढेश्वर, मोरबे धरण तसेच माची प्रबळ गडावर २५ पोलीस कर्मचारी व ३ पोलीस अधिकाºयांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून मद्यपी व मद्य घेऊन जाणारे आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.पनवेल तालुक्यातील गाढेश्वर धरण व त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये येणाºया पावसाळी पर्यटकांची संख्या मोठी असल्याने या भागात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना अथवा दुर्घटना घडू नये यासाठी पनवेल तालुका पोलिसांनी या भागात विशेष बंदोबस्त ठेवला आहे. त्याचप्रमाणे पावसाळी सहलीचा आनंद लुटण्यासाठी येणाºया पर्यटकांसाठी ठिकठिकाणी खास सूचना फलक लावून सदर सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लहान मुले, स्त्रिया व ज्या लोकांना पोहता येत नाही, अशा लोकांनी पाण्यात उतरू नये. गाढेश्वर धरणातून पनवेल शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो. त्यामुळे सदर नदीपात्रात उतरून त्यात कोणतेही पदार्थ अथवा वस्तू टाकून पाणी दूषित करू नये. सदर परिसरात अमली पदार्थ, दारू अथवा तत्सम मादक द्रव्य आणण्यास व पिण्यास मनाई आहे. तसेच अमली पदार्थ, दारू अथवा तत्सम मादक द्रव्य बाळगताना अगर पिताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.हा परिसर डोंगराळ असून रस्ते अरु ंद आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन वाहने, अ‍ॅम्ब्ल्युलन्स यांना जाण्या-येण्यासाठी रस्ता खुला रहावा यासाठी रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा तºहेने रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये, अन्यथा अशा वाहनचालकांवर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. याशिवाय येथे वर्षा सहलीसाठी येणाºया पर्यटकांनी वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा. तसेच नशा करून वाहन चालवू नये, तसे आढळून आल्यास संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. जनतेच्या जीविताच्या व सुरक्षेच्या दृष्टीने गाढेश्वर धरण, मोरबे धरण, कुंडी धबधबा परिसरामध्ये पावसाळी पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे.धरणाच्या परिसरात पर्यटकांना जाऊ दिले की ते पाण्यात उतरतात. काही दुर्घटना घडली की त्याचा पोलिसांना दोष दिला जातो. त्यामुळे दर शनिवार आणि रविवारी गाढेश्वर धरण परिसरात, मोरबे धरण, माची प्रबळकडे जाणाºया रस्त्याकडे, कर्नाळा किल्ल्याकडे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.>कारवाई सुरूगाढेश्वर धरणाकडे मद्याच्या बाटल्या घेऊन जाणाºया एका वाहन चालकावर तालुका पोलिसांनी कारवाई करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढेही पर्यटनस्थळी मद्यपान करणारे व गोंधळ करणाºयांवर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.माथेरानच्या डोंगराळ परिसरात पाऊस झाल्यास पाण्याच्या प्रवाहामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने व ते लगेच समजून येत नसल्याने काही लोकांचा यापूर्वी या नदीपात्रात बुडून मृत्यू होण्याच्या यापूर्वी काही दुर्घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी त्याबाबत दक्षता घ्यावी.- अशोक राजपूत,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,पनवेल तालुका