शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना परत पाठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:01 IST

उपमहापौरांचा ठराव : पालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी पदोन्नतीपासून वंचित

नवी मुंबई : शासनाने महापालिकेत दहा अधिकारी प्रतिनियुक्तीवर पाठविले आहेत, त्यामुळे पालिकेच्या आस्थापनेवरील अधिकाºयांना पदोन्नतीपासून वंचित राहावे लागत आहे. प्रतिनियुक्तीवरील अधिकारी लोकप्रतिनिधींचे ऐकत नाहीत. जनहिताच्या कामांकडे दुर्लक्ष करत असून या अधिकाºयांना त्यांच्या मूळ सेवेत पाठविण्यात यावे, असा प्रस्ताव उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनी सर्वसाधारण सभेमध्ये मांडला आहे.

महानगरपालिकेत शहर अभियंता, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नगरपालिका मुख्य लेखा परीक्षक, नगरपालिका सचिव, नगरपालिका उपआयुक्त, सहायक आयुक्त ही पदे आस्थापनेवरील कर्मचाºयांना पदोन्नती देऊन भरणे आवश्यक आहे; परंतु मागील काही वर्षांपासून अनेक महत्त्वाची पदे प्रतिनियुक्तीवरील अधिकाºयांकडे दिली जात आहेत. सद्यस्थितीमध्ये दोन अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मुख्य लेखा परीक्षक, पाच उपआयुक्त, एक शिक्षणाधिकारी, एक विभाग अधिकारी अशी एकूण दहा पदे प्रतिनियुक्तीवरील अधिकाºयांकडे सोपविण्यात आली आहेत. नियमाप्रमाणे राज्य शासनाच्या संवर्गातून एखाद्या योग्य अधिकाºयाची प्रतिनियुक्ती करून भरण्यासाठी कोणत्याही महापालिकेतील कोणतेही पद किंवा कोणत्याही पदांचा वर्ग राजपत्रात अधिसूचित करणे आवश्यक आहे. ज्या अधिकाºयांची प्रतिनियुक्ती करायची आहे, त्या अधिकाºयांचे नाव, राज्य शासनाच्या सेवेतील त्यांचे पद ज्या कोणत्या पालिकेच्या आस्थापनेवर प्रतिनियुक्ती करायची आहे, त्याविषयी अधिसूचना राजपत्रामध्ये करणे आवश्यक आहे; परंतु नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शासनाने पाठविलेल्या अधिकाºयांच्या नियुक्तीविषयी शासनाची अधिसूचना व अशा अधिसूचनेस विधानसभेची मंजुरी दिल्याची माहिती आयुक्तांनी सर्वसाधारण सभेला दिलेली नाही.

प्रतिनियुक्तीवरील अधिकाºयांमुळे पालिकेच्या आस्थापनेवर असलेल्या अधिकाºयांवर अन्याय होऊ लागला आहे. पालिका ओलीस ठेवली असल्यासारखे झाले असल्याचे मत प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. पालिकेमध्ये नियुक्ती केलेले शासनाचे अधिकारी लोकप्रतिनिधींचे ऐकत नाहीत. कायद्याने गठीत केलेल्या प्रभाग समिती, विधि समिती, स्थायी समिती व सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या ठरावासही अक्षता दाखविल्या जात आहेत. नगरसेवकांनी प्रभागातील जनहिताची सुचविलेली कामेही केली जात नाहीत. अधिकाºयांच्या दालनांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. हा विषय महापौरांनी परिषदेमध्ये उपस्थित करावा. सभागृहात याबाबत विचार विनियम करून त्या विषयी ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवावा, अशी मागणीही केली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेत दहा अधिकाऱयांचा समावेशनवी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठविलेल्या अधिकाºयांची प्रतिनियुक्ती महाराष्ट्र शासनाने अद्याप विधानसभा, विधान परिषद, यांची मान्यता घेतल्यासंबंधी महाराष्ट्र राज्य राजपत्रामध्ये अधिसूचना प्रसिद्ध केलेली नाही. आयुक्तांनी या विषयी स्थायी समिती व सर्वसाधारण सभेलाही या विषयी माहिती दिलेली नाही. यामुळे सर्व दहा अधिकाºयांना त्वरित मूळ विभागात पाठविण्याकरिता महासभेने बहुमताने ठराव मंजूर करावा, असा उल्लेख केला आहे.अधिकाऱयांमध्ये अन्यायाची भावनाअतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांची बदली झाल्यानंतर शहर अभियंता मोहन डगावकर यांची अतिरिक्त आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली होती. वास्तविक नियमाप्रमाणे दोन अतिरिक्त आयुक्तांपैकी एक शासनाकडील व एक पालिकेतील पदोन्नतीने भरणे आवश्यक आहे; परंतु शासनाने चव्हाण यांच्या जागेवर दुसरा अधिकारी पाठविल्यामुळे डगावकर यांना पुन्हा शहर अभियंता पदावर पाठविण्यात आले आहे. अशाचप्रकारे पालिकेतील इतर अधिकाºयांवरही अन्याय झाला असून, या ठरावावर सर्वसाधारण सभेत काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका