शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशीत राईट टू सर्व्हिस विषयावर चर्चासत्र: सेवा अधिकार कायद्यामुळे नागरी कामांना गती - स्वाधीन क्षत्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 04:14 IST

प्रशासकीय कामात गतिमानता व पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने राईट टू सर्व्हिस अर्थात सेवा अधिकार कायदा उपयुक्त ठरला आहे. या कायद्याअंतर्गत नागरिकांना घरबसल्या विविध सेवा उपलब्ध होत आहेत.

नवी मुंबई : प्रशासकीय कामात गतिमानता व पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने राईट टू सर्व्हिस अर्थात सेवा अधिकार कायदा उपयुक्त ठरला आहे. या कायद्याअंतर्गत नागरिकांना घरबसल्या विविध सेवा उपलब्ध होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी या सेवेविषयी अधिक जागरूक व साक्षर होणे गरजेचे असल्याचे मत सेवा अधिकार आयोगाचे अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांनी व्यक्त केले.नवी मुंबई फर्स्ट या सामाजिक संस्थेच्या वतीने वाशीत राईट टू सर्व्हिस या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून क्षत्रिय उपस्थित होते. तसेच सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. व पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. सेवा अधिकार अधिनियमामुळे ना हरकत प्रमाणपत्र, जन्म दाखला, लग्न नोंदणी प्रमाणपत्र, मृत्यूचा दाखला तसेच बांधकामासाठी भोगवटा प्रमाणपत्र आदी जवळपास ४00 सेवा घरबसल्या आॅनलाइनवर मिळविता येणार आहेत. त्यासाठी मोबाइल अ‍ॅपही विकसित करण्यात आला असून कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे नागरिकांना आपणाला हव्या त्या परवानग्या मिळविता येणार आहे. ही सेवा क्रांतिकारी स्वरूपाची असून यासंदर्भात सर्वसामान्य नागरिकांसह शासकीय स्तरावरही जागरूकता येणे गरजेचे असल्याचे मत स्वाधीन क्षत्रिय यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात व्यक्त केले. तर नागरिकांच्या सोयीसाठी लवकरच सिडकोत एसएएस सर्व्हिस सुरू करणार असल्याची माहिती सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिली. सेवा अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असून त्यादृष्टीने नागरिकांत जागरूकता आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिली. तर पनवेल महापालिका नवीन असल्याने सध्या परवानग्यांसाठी येणारे प्रमाण कमी आहे. तथापि भविष्यात यात होणारी वाढ लक्षात घेवून सेवा अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे पनवेलचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.